अदानी स्मार्ट मीटर मागे प्रति महिना हजार रुपये काढतो. तुमचा मीटर बंद करून तुम्ही गावी जा नाहीतर आणखी कुठेही जा. न वापरलेल्या विजेचे भाडे नवीन स्मार्ट मीटर मुळे तुम्हाला हजार रुपये ज्यादाचे येते..
मोदी सरकारने अमेरिका, अदानी आणि अंबानींकडे भारत देश गहाण ठेवला आहे. युपी, बिहार मध्ये ज्यादा येणाऱ्या बिलांमुळे त्रस्त झालेल्या गोरगरीब नागरिकांनी हे मीटर उखडून ते तेथील वीज कार्यालयांत नेवून आपटले आहेत. आपल्याकडे मुंबईत महाराष्ट्रात सुद्धा अव्वाच्या सव्वा वीजबिले येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, महाराष्ट्र्र प्रचंड सोशिक असल्याने हे सर्व अन्याय सहन करीत आहे. गोरगरिबांसाठी कुठलाच पक्ष उरला नसल्याने आता लोकांनीच मैदानात उतरून हे मीटर काढून टाकावेत आणि सौर ऊर्जेचा विचार करावा. मोदी सरकार अडाणी, अंबानींचे घर भरीत आहे आणि सर्वसामान्यांना बेघर करीत आहे. हजारो कोटी रुपये अदानीच्या घशात ओतताना यातील खुपसा हिस्सा सरकारला सुद्धा मिळतो हे न कळण्या इतकी जनता दूधखुळी नाही. मात्र, अंधभक्त आणि गोदी मीडिया मुळे लोकांची दिशाभूल केली जात आहे.. अच्छे दिन आ गये..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.