अभिजित दीपके च्या कॉकरोच जनता पार्टीचे भवितव्य काय.. ?? असा प्रश्न सध्या अनेक लोक विचारीत असले तरी अभिजीतला थोडा वेळ द्यायला हवा असे सुद्धा काही लोक म्हणत आहेत. पण, अगदीच स्पष्ट बोलायचे झाले तर सध्या वेळच नाही. कारण तवा गरम असतांनाच पोळी भाजायची असते..
भाजप पक्ष इतका पाताळयंत्री आहे की त्यांना जास्त वेळ दिल्यास ते अभिजीतचा गाशा गुंडाळायला त्याला भाग पाडतील. जंतर मंतरच्या कॉकरोचच्या आंदोलनाचा आढावा घेता या चळवळीत सोनम वांगचुग सारखे भाजपने त्रास देऊन तुरुंगात टाकलेले शास्त्रज्ञ जरी उतरले असले तरी ही चळवळ फक्त नीट परीक्षा पेपर फुटी आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या पुरतीच मर्यादित राहणार की येत्या काळात राजकीय पक्ष म्हणून निवडणुकांच्या रिंगणात उतरणार हे बघणे रंजक ठरणार आहे. या चळवळीत उतरलेल्या काही विद्यार्थी प्रतिनिधींच्या मुलाखती ऐकल्या असता आम्ही फक्त नीट चा घोटाळा या कॉलवर या चळवळीत उतरलो आहोत असे यांचे म्हणणे आहे. जर अभिजीतने राजकीय पक्ष म्हणून कॉकरोचला पुढे आणले तर कदाचित आम्ही वेगळा विचार करू असे हे लोक म्हटले. तात्पर्य काय तर अभिजित आणि टीम मेहनत करणार व जर ते प्रत्यक्ष राजकारणात उतरलेच नाही तर त्यांच्या चळवळींचा आप आणि काँग्रेस अथवा इतर पक्षांना फायदा होईल.
अभिजीतने हे आंदोलन जंतर मंतर ऐवजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरासमोर अथवा कार्यालयासमोर करायला हवे होते. या नीट परीक्षा पेपरफुटीमुळे 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या आई वडिलांना या आंदोलनात बोलवून स्टेजवर बोलायला द्यायला हवे होते.. एक ना दोन असे अनेक प्रश्न या आंदोलन नंतर उपस्थित केले जात आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला स्मरून हे शांततेने केले गेलेले आंदोलन असले तरी भाजपसारख्या गुंड आणि नीतिमत्ता कोळून पिलेल्या पक्षाला याने काही फरक पडेल असे मुळीच वाटत नाही. आणि म्हणून जास्त वेळ वाट न बघता कॉकरोचने आपले पुढील धोरणं जाहीर करून नेपाळ मध्ये बालेन्द्र शाह यांनी जशी क्रांती केली तसा विचार करायला हरकत नाही. आणि गोदी मीडियाचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. मोदी आणि भाजपचे तळवे चाटून या लोकांनी इतकी मोठी जेन झी क्रांती घडत असतांनाही त्याची दखल घेतली नाही.. कॉकरोचने आता साम, दाम, दंड, भेद.. नीती अवलंबून भाजपला सळो की पळो करून सोडण्याची वेळ आली आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.