लोकशाहीचे मारेकरी आपणच आहोत..

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद वगळता खूप नेभळट आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे..

आपण प्रगती, महिला, बाल विकास, वैज्ञानिकता, रोजगार, शाळा, कॉलेज, दवाखाने, वाहतूक, सर्व प्रकारचे छोटे मोठे उद्योग व्यवसाय, वीज, पाणी आणि आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ न होता मंदिर, जातीयता, बुवाबाजी यांसारख्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि भाजप याला पाठिंबा देत असलेल्या खुळचट  कल्पनांना चिकटून बसल्याने आपली दिवसेंदिवस अधोगती होत आहे. देव धर्माला आता रिटायड करा असे आमचे स्पष्ट मत आहे. प्रत्यक्ष देव पाहिलेला आणि स्वर्गात जाऊन सदेह पुन्हा पृथ्वीवर आलेला एकही माणूस या विश्वात अस्तित्वात नाही हे सर्वांना ठाऊक असूनही देव-धर्माच्या नावावर काही मंडळी त्यांची दुकाने चालवीत आहेत आणि आपण त्यांची गिऱ्हाईकं बनत आहोत. आणि गेली चार पाच हजार वर्षे देवाची आणि स्वर्ग नरकाची भीती आपल्या मानगुटीवर बसविलेली आहे.

मंदिरं बांधण्यापेक्षा माणुसकीचे राजवाडे बांधा.. आपल्याला ठाऊक आहे भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे तरी आपण इतके षंढ झालेले आहोत की त्या विरोधात आवाज उठविण्याची आपली हिंमत नाही. नुकताच कॉकरोच जनता पार्टीने जन्म घेतला आहे व असंतुष्ट तरुण आणि लोकशाही मानणारे सामान्य आणि इतरही तिकडे वळले आहेत. पण, त्या कॉकरोचच्या अभिजित दीपके मध्ये किती दम आहे .. तो टिकतो की पळून जातो हे येणार काळ ठरवेल.. तूर्तास आपण भारताचे नागरिक आणि मतदार असूनही तथा  इतके सारे आजूबाजूला घडत असूनही मरून पडलेले आहोत. म्हणून आम्ही म्हणतोय की लोकशाहीचे खरे मारेकरी आपणच आहोत म्हणून.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

90

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.