सत्तेसाठी काहीही..

सध्या सर्वच पातळीवर राजकारणाचे बाजारीकरण झाले असल्याने मतदारांनी आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी कुणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाही.. 

सर्वकाही सत्ता आणि पैशांसाठी चालले आहे. मतदारांशी बांधिलकी ही तर या पक्षांतर करणाऱ्या आणि पक्ष फोडणाऱ्या बांडगुळांनी केव्हाच संपविली आहे. सर्वसामान्य लोकांना हे मूर्ख समजत आहेत कारण खरंच सर्वसामान्य मूर्खच आहेत. आज बारा वर्ष मोदी हे अंधभक्त आणि गोदी मीडियाच्या जीवावर लोकांना मूर्ख बनवीत आहेत. ते जे काही खेळ खेळत आहेत हे सर्वांना कळतय मात्र वळत नाही. पैसे आणि सत्तेसाठी हे नालायक राजकारणी रस्त्यावरून नागडे सुद्धा पळतील. खरंतर लोकांनी यांचे ढुंगण लाल करण्याची व यांना कायमचे राजकारणातून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. पण, सर्वसामान्य इतका नेभळट आहे की तो अजूनही पेटून उठत नाही. इथे चांगल्या राजकारण्याला किंमत नाही आणि रोज पैसे घेऊन पक्ष आणि शब्द बदलणाऱ्या महाभागांना किंमत आहे. यात स्त्रिया सुद्धा मागे नाहीत. या असल्या बदफैली लोकांचा तरुणांनी अजिबात आदर्श घेऊ नये. तुम्ही मोर्चे काढा, कॉकरोच जनता पार्टी सारखी  धरणे धरा, उपोषणे करा. मात्र, या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना पाझर फुटणार नाही. हे स्वार्थासाठी स्वतःचे आई वडील विकतील तिथे देश आणि तुम्ही आम्ही काय चीज आहोत हो.. सावध व्हा व आता देशव्यापी आंदोलन करून या सगळ्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या आणि देशातील लोकशाही मारून छुपी हुकूमशाही सुरु केलेल्यांना कायमचे उपटून टाका.. कारण हे जे काही चाललंय ना ते सर्वकाही सत्तेसाठी चाललं आहे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

111

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.