हिंदू कोडबिलाचे फायदे घेणाऱ्या काही सो कॉल्ड महिलांना फायदे चालतात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर नकोत..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज जगाने स्वीकारले आहे मात्र भारतातील काही जातीयवादी लोकांना बाबासाहेबांचा तिटकारा आहे. जर बाबासाहेब एवढेच आवडत नाहीत तर त्यांनी दिलेल्या हिंदू कोडबिलाला नाकारून मनुवाद स्वीकारा ना..  

उठसुठ आरक्षणावर बोलणाऱ्या काही जातीयवादी महिलांनी नाकाने कांदे सोलण्या पेक्षा बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती लाथाडाव्यात.. हजारो वर्ष दलितांवर अन्याय केलेली मंडळी स्वतःवर आल्यावर आरक्षणावर बोलू लागली आहेत. 

बाबासाहेबांनी दलितांपेक्षाही सर्वात जास्त सर्वधर्मीय महिलांना भरपूर अधिकार देऊन त्यांच्या पायावर उभे केले आहे. आणि आज या सो कॉल्ड महिला जयभीम चा विटाळ करीत आहेत..  

हिंदू कोडबिल (हिंदू संहिता विधेयक) हा हिंदू समाजातील विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान यांसारख्या वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा करून त्यांना कायदेशीर रूप देणारा मसुदा होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना समाजात समान हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी हा महत्त्वाचा मसुदा तयार केला होता.मुख्य तरतुदीएकपत्नीत्व: पुरुषांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली.घटस्फोटाचा अधिकार: पती-पत्नीला कायदेशीर मार्गाने घटस्फोट घेण्याची आणि पत्नीला पोटगी मागण्याची मुभा मिळाली.संपत्तीत समान हक्क: वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना मुलांइतकाच समान वारसाहक्क देण्याची तरतूद होती.दत्तकविधान: मुलाप्रमाणेच मुलीलाही कायदेशीररीत्या दत्तक घेण्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला.महत्त्व आणि परिणामहे विधेयक एकाच वेळी संमत होऊ शकले नाही, कारण त्यावेळी त्यास मोठा विरोध झाला होता. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.नंतरच्या काळात (१९५५-१९५६ मध्ये) पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने या बिलाचे तुकडे करून हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा अशा वेगवेगळ्या कायद्यांच्या स्वरूपात मंजूर करून घेतले. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

68

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.