बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे गहू ही पडून राहतात..

मित्रांनो आजच्या जगात तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तग धरून रहायचे असेल तर तुमच्या अंगात जी कुठली कला आहे ती लोकांसमोर मांडणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जर बोललाच नाही तर तुमच्या मनात काय चालले आहे हे समोरच्याला कसे कळणार? प्रत्येकवेळी शांत बसने योग्य नाही तसेच प्रत्येक वेळी बोलत सुटणे सुद्धा योग्य नाही. मात्र, जर आपल्याला आपले कार्य सिद्धीस न्यायचे असेल तर मुके राहून कसे चालेल बरे. बोलणारा माणूस कधीच आणि कुठेच उपाशी मरत नाही..

काही लोकांना वंश परंपरेने काही गोष्टी मिळतात. मात्र या गोष्टी टिकवून ठेवायला सुद्धा अंगात धमक लागते. लोक तुमच्या बापजाद्यांना आठवून तुमची एकदा वाहवा करतील दोनदा वाहवा करतील. मात्र तुमच्यात तुमचे स्वतःचे कर्तृत्वच नसेल तर तुम्ही अडगळीत पडाल. म्हणून क्षेत्र कुठलेही असो रबरी शिक्का बनून बसण्या पेक्षा तुमच्या मनगटातील जोराने स्वतःला सिद्ध करा.. नेहमी रडत कुढत बसणाऱ्या आणि नशिबाला दोष देत समोरच्या हितचिंतकांचे न ऐकणाऱ्या अबोल माणसांना कुणीही गणतीत धरीत नाहीत..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

77

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.