लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे..

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवलदारांचे लाळघोटे चमचे देखील म्हणतात..

अर्थात सगळेच पत्रकार विकाऊ नाहीत आणि लाळघोटे देखील नाहीत. पण आज पैसे कुणाला नकोत हो.. आपल्याकडे चांगले घर असावे, मुलाबाळांना गाडीघोड्यात फिरता यावे, राहणीमान उच्च दर्जाचे असावे असे पत्रकारांना वाटणे गुन्हा नाही. त्यातही जे पत्रकार सत्ताधारी, भांडवलदार आणि पैसेवाले विरोधी पक्षनेते यांच्या जवळचे असतात, पोलिसांच्या जवळचे असतात त्यांची खूप चांदी असते. आपल्याला जर माहित असेल तर सत्ताधाऱ्यांनी पूर्वी सत्ता मिळविण्यासाठी आणि नंतर पुन्हा निवडून येण्यासाठी नव्वद टक्के मीडियाला भरमसाठ पैसे देऊन आपल्या दावणीला बांधले. आजही हा पैसे खाल्ल्याने मूग गिळून गप्प बसलेला मीडिया एपस्टीन फाईल बद्दल काही बोलत नाही.  भारताची झालेली प्रगती याचा सत्ताधाऱ्यांकडून केला गेलेला खोटा प्रचार यावर देखील बोलत नाही. पैसे मिळतात म्हणून व्यक्ती आणि राजकीय पक्षांचे तळवे चाटण्यात  खूपसे पत्रकार स्वतःला खूप धन्य समजतात.

मुळात प्रशिक्षित पत्रकारां पेक्षा आज कुणीही ऐरा गैरा पत्रकार होत आहे. या लोकांना बातमी कशाशी खातात हेही ठाऊक नसते. या लोकांना फक्त ब्लॅकमेल करून नाहीतर हाजीहाजी करून पैसे कमावता येतात. मुळात प्रशिक्षित पत्रकारांनाच गृहीत धरले जावे व त्यांनाच बातम्या द्याव्यात. बरीचशी वृत्तपत्र अगदी अल्पस्वल्प मानधन देत असल्याने पत्रकारांना जगणे मुश्किल होते. आम्ही पैसे खाणाऱ्या पत्रकारांचे समर्थन करीत नसलो तरी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पोटाची आग क्षमविण्यासाठी पत्रकार पाकिटं स्वीकारतात. जर पत्रकारांना भरभक्कम पगार दिला अथवा मानधन दिले तर हेच पत्रकार स्वतःला देशाचे भाग्यविधाते समजणाऱ्या गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या नेत्यांचे बारा वाजवतील. पत्रकारांना तगडा पगार द्यावा, मानधन द्यावे या मताचा मी आहे. आणि फक्त पत्रकारांना दोष देत बसण्यापेक्षा जनता काय झोपली आहे काय ? त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते कळत नाही काय ? काही अपवाद वगळता विरोधी पक्ष आणि नेते देखील त्यांचे घोटाळे सत्ताधारी बाहेर काढतील म्हणून बिळात लपून बसले आहेत. आणि सोशल मीडियाचा वापर करणारे मोजके लोक आणि माता भगिनी सोडल्यास बाकीचे काही तथाकथित रिल च्या नावाने नंगानाच करून आपल्याला काय करायचेय देशाचे असे समजून खुशीत गाजरं खात आहेत.  म्हणून पत्रकारांकडे एक बोट दाखविताना  चार बोटं आपल्याकडे आहेत हे सर्वसामान्य लोकांनी कधीच विसरू नये..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

94
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.