षंढयुग..

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या प्रमाणात लोक षंढयुगात वावरत आहेत असे म्हटल्यास कुणाच्या बुडाला मिरच्या झोम्बण्याचे काहीच कारण नाही..

घरात बसून समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादी अनेक विषयांवर बाता झोडणारे खूपसे लोक आपल्या अवतीभोवती काय चालले आहे हे ठाऊक असूनही मूग गिळून गप्प बसतात. खरेतर हे षंढपणाचे लक्षण  आहे. आपण अजूनतरी कागदोपत्री का असेना पण लोकशाहीत वावरत आहे आणि लोकशाहीने आपल्याला लिहिण्या, बोलण्याचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. पण, आपण बोलतच नाही. भाजप सरकारने देश रसातळाला चालविला आहे हे ठाऊक असूनही आपण व्यक्तिपूजेत इतके मश्गुल आहोत की आपण मोदींपुढे देशाला कमी लेखत आहोत. अहो एवढेच काय आपण इतके षंढ आहोत की दुसऱ्या कुणी बोललेल्या, लिहिलेल्या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याचीही आपली लायकी नाही. बदल घडवायचा असेल तर अगोदर स्वतःपासून घडवायला हवा हे तुमच्या ध्यानातच येत नाही. ही दुनिया नेभळटांना कधीच माफ करीत नाही. किड्या-मुंग्यांसारखे जगणे याला काय जगणे म्हणायचे काय ?? अजूनही जागे व्हा.. मोदीसाहेब पुन्हा अप्रत्यक्ष लॉकडाऊन कडे आपल्याला घेऊन चालले आहेत. आणि हो तुमच्या घरातील थाळ्या चांगल्या घासून पुसून ठेवा काय सांगावं पुन्हा आपले विश्वगुरू ,महागुरू मोदीसाहेब थाळ्या वाजवायला सांगतील.. झोपा आता कारण तुम्ही कधीच जागे होऊ शकत नाही.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

162

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.