देव भक्तिभावाचा भुकेला आहे पैशाचा आणि सोन्या-नाण्याचा नाही..

चर्चेतली बातमी.. 

लहानपणी ज्येष्ठ मंडळी आणि शाळेतील शिक्षक नेहमी सांगायचे की, देव भक्तिभावाचा भुकेला आहे पैशाचा आणि सोन्या-नाण्याचा नाही.. मग आजच नेहमी पेक्षा जास्त देवाच्या नावावर बाजार का भरवला जातो आहे..?? राममंदिरात दोनशे कोटी रुपये पुजारी आणि संस्थेने हडपल्या पासून हा प्रश्न जरा जास्तच ऐरणीवर आला आहे. प्रश्न फक्त राममंदिराच्या लुटीचा नाही तर वर्षानुवर्षे देवाच्या नावाने प्रत्येकच संस्थानात हे सर्व आपल्या मालकी हक्काचं आहे असं समजून जी लूट चालली आहे त्याचा आहे.. जर देवाने सृष्टी निर्माण केली आहे आणि जर देवच आपला कर्ताधर्ता, पालनकर्ता आणि करविता आहे. त्याचबरोबर देवाच्या इशाऱ्या शिवाय झाडाचे पानही हलत नाही. आणि देवाने जे नशिबात लिहिलं आहे तेच तुम्ही कितीही मेहनत करा अथवा करू नका घडते. आणि देवच सर्वकाही आपल्याला देतो मग त्या देवाला भक्तांच्या सोन्या-नाण्याची आणि पैशाची गरजच काय ?? तो तर काहीच आणि कधीच बोलत नसल्याने दान मागतच नाही.. साधं लॉजिक आहे हो हे कळत नाही काय लोकांना ?? 

आम्ही हे कुणा एकाच्याच बाबतीत नाही तर अगदी सर्वच वारेमाप पैसे कमविणाऱ्या देवालयांबद्दल बोलतो आहे . यात सर्व आले बरे.. देवाला सर्वच भाषा येतात किंबहुना त्यानेच त्या निर्माण केल्या असे जे सांगितले जाते मग देवाला फक्त संस्कृत मध्ये त्याची पूजा केलेलीच कळते का ?? ( हे संस्कृत किती बरोबर बोलतात हा संशोधनाचा विषय आहे.. )

राममंदिर दोनशे कोटी हडप केल्या प्रकरणा पासून बहुतांश बुद्धिजीवी आणि वास्तववादी म्हणू लागले आहेत की, कुठल्याच मंदिराच्या दानपेटीत पैसे-अडके आणि सोन्या-चांदीची भेट दान न करता देवाला फक्त - फुले वहा.. मंदिरातील संपत्तीचा विनियोग कसा होतो..?  कुणासाठी होतो..? आणि विशिष्ठ समाजच इथे देवावर असलेल्या पिढीजात मालकीहक्का प्रमाणे वर्षानुवर्षे इथे पुजारी कसा काय राहू शकतो..? याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच दानपेटीत पैसे अथवा इतर मौल्यवान वस्तू भेट चढविण्यापेक्षा त्या ज्याला गरज आहे अशा गरजवंतांना द्या.. देव जर असेलच तर तो तुमच्या या कृत्याने निश्चितच सुखावेल.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

68

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.