महाराष्ट्रातील जनता खूप सोशिक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भरमसाठ वाढलेली वीजबिले आणि सर्वच क्षेत्रातील वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपले कंबरडे मोडीत आहे. पण तरी मराठी माणूस हू की चू करीत नाही. त्या युपी बिहार मध्ये वीजमीटर उखडून टाकली आहेत..
मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. एका सर्वेक्षणाद्वारे 86 टक्के लोकांना हे सरकार नको आहे. मग तरी हे जुलमी आणि संघविचारी सरकार निवडून कसे आले.? उत्तर सोपे आहे ईव्हीएम मशीनच्या जीवावर. एरव्ही मराठी माणसांच्या नावाने बोंबा ठोकून राजकारण करणारे पक्ष आता या वाढत्या वीजबिल बाबतीत अजूनही आक्रमक का झाले नाहीत ? अदानी, अंबानी आणि अमेरिकेला देश विकलेल्या मोदी सरकारला आता खाली खेचायलाच हवे. ज्यांचा पगार दहा हजार रुपये आहे त्यांनी महिन्याला चार पाच हजाराचे लाईट बिल कसे भरावे ? आणि ज्यांच्या घरात एसी आहेत त्यांना तर सरसकट दहा बारा हजाराच्या पुढे वीजबिल येत आहे. मोदींचे अंधारयुग संपवायला एकही माईचा लाल अजून पैदा झाला नाही काय ?? जे चाललंय ते फार चूक चाललं आहे.
सर्वसामान्य लढत आहेत मात्र त्यांना तगडा पाठिंबाच भेटत नसल्याने या लढण्याला ताकद येत नाही. हे गल्लाभरू आणि अतिशय फडतूस सरकार सौर उर्जेला का अनिवार्य करीत नाही.? उत्तर सोपं आहे त्यांनी असं केलं तर अदानी आणि अंबानी फायदा कसा कमवणार.. आम्ही या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो आणि पक्ष निडवून येण्यासाठी नको तिथे पैसे वाटलेल्या सरकारला असा प्रश्न विचारतो की, लाडक्या बहिणींच्या पैशाचे काय झाले हो. ? गरज सरो आणि बहीण मरो.. मोदी सरकार आणि फडणवीस आपल्या तोंडाला पाने पुसत आहेत. दूधखुळ्यांनो हे तुमच्या लक्षात येत नाही काय ?? आता या सरकारच्या आणि महागाईच्या विरोधात यादवी होणे काळाची गरज आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.