CJP मोर्च्यात तरुणांवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात हुकूमशाही लागू झाली..

लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून नेणारे भाजप सरकार.. आणि हे कुणाला वाचवायला तर केवळ पदवीधर असलेला मात्र, यांच्या सरकारात शिक्षण मंत्री असलेला धर्मेंद्र प्रधान याच्या साठी..

सोनम जी शिक्षण तज्ज्ञ तर आहेतच पण ते शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. जगातील दहा देशांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. खरे तर त्यांच्या सारखा माणूस शिक्षण मंत्री हवा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, भाजपच्या हुकूमशाही सरकारने आणि यांचे तळवे चाटणाऱ्या मीडियाने त्याचबरोबर अंधभक्तांनी देशाचे खोबरे करून लोकशाहीचा मुडदा पाडला आहे. एवढे होत असूनही अजूनही काही नेभळट मंडळी विद्यार्थ्यांच्या मागे उभी रहायला घाबरत आहे. अभिजीत दिपके खूप छान लढत आहे. मार खाऊन, तोंडावर शाई घेऊन सुद्धा तो घाबरला नाही.. त्याच्या बरोबर असलेल्या अगदी सर्वांचेच अभिनंदन. या भ्याड सरकारने त्या धर्मेंद्र प्रधानाला लाथ मारून काढून टाकण्या ऐवजी विद्यार्थ्यांवर ते जणू अतिरेकी आहेत असे समजून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाणी फवारले आणि लाठ्या चालविल्या त्यात 150 विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका मुलीच्या गळ्यावर लाठी लागल्याने ती सिरिअस आहे. जर तिला काही झाले तर याला जबाबदार मोदी असतील असे दिपके म्हटला आहे. या सरकारचा अंत जवळ आला असल्याने सरकार माजोरी झाले आहे. या भ्रष्टाचारी आणि खुनी सरकारातील मंत्र्यांवर यांचे सरकार गेल्यावर गुन्हे भरवून यांची मालमत्ता जप्त करावी आणि यातील गुंडांना फासावर लटकवावे.. CJP ला जाहीर पाठिंबा देऊन विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या या निर्दयी हुकूमशाही सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

65

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.