नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच दिसायची..'
या वाक्याशी मी तरी एकशेदहा टक्के सहमत आहे.. एक टक्क्यापेक्षा कमी अपवाद वगळता आज लाचखाऊ, भाडखाऊ मीडिया मोदी साहेबांनी न केलेल्या गोष्टींची तुतारी फुंकीत आहे व लोकांच्या डोळ्यात धूळ फेकीत आहे. मोदींनी लोकांना हे करू नका ते करू नका असे अकलेचे तारे तोडले आहेत. मात्र, स्वतः 2021 ते 2025 या काळात मोदींच्या परदेश दौऱ्यावर 462 कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हटले जात आहे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याची विश्वासार्हता खरेतर औकात मीडिया विसरलेली आहे. मोदींच्या पक्षाकडून लाच खात असल्याने मीडिया मोदींविरोधी म्हणजे मोदींच्या चुका आणि ते घेत असलेले देश आणि सर्वसामान्यांना खड्ड्यात घालणाऱ्या निर्णयाविरुद्ध बोलायला घाबरत आहेत. राजकारणी तर आहेतच हो पण, मीडिया सुद्धा बेशरम असल्याने देश रसातळाला चालला असल्याचे आमचे ठाम मत आहे. आणि आम्ही हे आकसापोटी फक्त मोदींनाच बोलतोय असे मुळीच नाही बरे..
इथे राहुल गांधी अथवा इतर कुणी जरी असे वागले आणि भारत देश आपले संविधान आणि सर्वसामान्य जनता मातीत जात असेल तर कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आम्ही त्यांची टीकाच करू. काँग्रेस वगळता इतर सर्व नेभळट विरोधी पक्ष, स्वाभिमान गहाण टाकलेला मीडिया आणि षंढ झालेली मूर्ख जनता यांच्यामुळेच आपल्या घटनादत्त लोकशाही असलेल्या भारतावर छुपी जातीयवादी हुकूमशाही लादली गेली असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. आता भारतात लोकांचा उठाव होऊन हुकूमशाही मोडीत काढणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर भाडखाऊ विकला गेलेला मीडिया आणि त्यातील लाचखाऊ पत्रकारांना लोकांनी पकडून त्यांची ढुंगणं चाबकाने फोडून काढायला हवीत. अरे बेशरमांनो तुम्ही पत्रकार अहात ना ? मग जे जे खरे आहे आणि जे जे खोटे आहे ते मांडा ना बिनधास्त.. पण नाही होत असे. या विकल्या गेलेल्या पत्रकार मंडळींपेक्षा युट्युबर आणि युट्युब क्रिएटर बिनधास्त अन्यायाविरोधी पॉडकास्ट आणि पोस्ट टाकीत आहेत. या लोकांचे खरंच करावे तेवढे कौतुक थोडे आहे. अरे सापासारख्या स्वस्थ पडलेल्या हाडामांसाच्या लोकांनो आतातरी जागे व्हा व उखडून टाका या हुकूमशाही बळकट करणाऱ्या चमकोगिरी करणाऱ्या सरकारला.. आहे का दम तुमच्यात..??
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.