स्वतःच्या स्वार्थासाठी अंधभक्त झालेल्या अभिनेते अभिनेत्री मंडळींना त्यांची लायकी दाखवा..

सध्या भारतात लोकशाहीला मारून अघोषित हुकूमशाही सुरु असल्याचे सारे जग पाहत आहे. त्यात गोदी मीडिया मुळे स्वतः गोदी मीडिया आणि मोदी सरकार गोत्यात आले आहे..

त्यात गोमूत्र आणि शेण खाऊन स्वतःला मोदीदूत समजणारे अंधभक्त मोदींची इज्जत वेशीवर टांगायला कारणीभूत झाले आहेत. आणि स्वतः मोदींनी आणि त्यांच्या जातीयवादी सरकारने इतके दिवे लावले आहेत की त्यांचे बारा वाजले आहेत. त्यात आता ज्यांच्यावर कुत्रं सुद्धा मुतायला टांग वर करीत नाही असे मोडीत आणि अडगळीत पडलेले अभिनेते अभिनेत्री मंडळी मोदींचे पाय धुवून पिल्यास आपल्याला खासदार करतील अथवा काहीतरी मोठे पद देतील असे वाटू लागल्याने काहीबाही बरळायला लागले आहेत. आणि म्हणूनच ही पडद्याआड गेलेली मंडळी अगदी रोज मोदींची आरती ओवाळीत आहेत आणि जेन झी मंडळींची टीका करीत आहेत. पण याने याच कलाकारांची इज्जत वेशीवर टांगली जात आहे. खऱ्याला खरे बोलावे आणि जे चुकत असेल त्याला चूक म्हणावे.. जे येईल त्या सरकारची फक्त लाळ घोटून  आणि पुढे पुढे करून स्वतःच्या पदरात सवलती पाडून घेण्याची काही अपवाद वगळता बहुतांश कलाकारांना सवयच असल्याने अशा लाळघोट्या कलाकारांना आता समाजाने त्यांची लायकी दाखवून द्यावी. ही मंडळी नाहक आगीत तेल ओतत असल्याने यांना कुणीही समोर उभे करू नये असे सांगावेसे वाटते.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

73

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.