स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्यांवर कोण विश्वास ठेवेल ? आणि का ठेवावा..??

हल्ली राजकारणी इतके निर्लज्ज झाले आहेत की स्वतःपुढे त्यांना पक्षनिष्ठा आणि नैतिकता तथा मतदारांचा विश्वास याची किंमतच उरलेली नाही..  हे पक्षबदलू लोक इतके निर्लज्ज आहेत की हे स्वतःच्या आई बापाचे होत नाहीत तर तुमचे आमचे काय होणार..

खरे तर अशा सर्वपक्षीय गद्दारांना मतदारांनी खेटराने बडवायला हवे व यांना कायद्याने पक्षबदल करू देऊ नये. जर तुम्हाला पक्ष बदलायचा असेल ना आणि तुम्ही इतकेच लाजेचे अहात ना तर मग ती टर्म पूर्ण होईस्तोवर त्याच पक्षात रहा. आणि टर्म पूर्ण झाल्यावर खुशाल जिकडे जायचे तिकडे जा. आणि तुमच्या मनगटात इतकाच जोर आहे तर लोकांची पुण्याई आणि लोकांचे पक्षचिन्ह घेता कशाला हो. तुम्ही स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा ना. आयजीच्या जीवावर बायजीने उदार व्हायचं आणि ज्याने आपल्याला पंख दिले आहेत संधी दिली आहे अशा लोकांनाच डसायचं.. याला गद्दारी म्हणतात हो.. आणि कुणी पक्ष सोडला की लगेच काही पाकीटं घेणारे पत्रकार अमुक तमुकने पक्ष सोडल्यावर खळबळ उडाली अशा बातम्या देतात. अरे या पक्ष सोडणाऱ्या गद्दारांना आणि पैशासाठी कुठेही सेट होणाऱ्या लोकांना कुत्रं सुद्धा विचारीत नाही. हे असले संधीसाधू लोक गेल्याने खरंतर कुणालाच काहीच फरक पडत नाही. असे स्वार्थी लोक कधीच कुणाचे होऊ शकत नाहीत. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांनी जनतेच्याच पैशावर शेखी मिरवून आम्ही तुमच्यासाठी विविध योजना राबवित आहोत असे म्हणणाऱ्या  दलबदलू राजकारण्यांना आपल्या समोर उभेच  करू नये..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द  खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

144

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.