सत्ताधाऱ्यांचे गलिच्छ राजकारण आणि हतबल मतदार..
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती मृत्यूची एफआयआर घ्यायला टाळाटाळ करणारे भाजप सरकार आणि दस्तुरखुद्द अजित दादांच्या पत्नी व सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनीता वहिनी पवार त्याच बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ही धूप न घातलेल्या पोलिसांनी कुणीतरी कांबळे नावाच्या बाईने रात्री बारा नंतर केलेल्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते व पुण्यातील पाणी, रस्ते, गटार व्यवस्था व नियोजनाचा उडालेला फज्जा याच्यावर बोलल्याने संतोष पंडित यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला थेट रात्री दोनच्या दरम्यान अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलीस एवढे सक्षम कुणाच्या सांगण्यावरून झाले हे सांगण्याची मुळीच गरज नाही. आणि कोण ही कांबळे बाई ? ज्यांच्या बद्दल पंडित बोलले त्यांना काही वाटले नाही आणि ही बाई दुपारी व्हिडिओ बघते काय आणि हिला त्यात अश्लील वाटते काय आणि ही उठते काय आणि पोलीस स्टेशनात जाते काय आणि अत्यंत कार्यक्षम पोलीस पंडितांना अटक करतात काय. पोलीस इतकेच सक्षम आहेत तर अजित दादांच्या मृत्यूची चौकशी करणारी एफआयआर का नोंदवून घेत नाहीत ? आणि इतर प्रकरणात इतके जागरूक का राहत नाहीत हा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे. ही कांबळे नावाची बाई पंडित बोलण्यापेक्षा अश्लील चेहरा, भाषा आणि हावभाव करून बोलत होती. खरे तर हिला बळ सत्ताधाऱ्यांनीच दिले असल्याचे लोक जाणतात..
आम्ही इथे कुठल्याच जातीवर टीका करीत नाही, महिलेवर टीका करीत नाही, किंवा आम्ही जातपात अजिबात मानीत नाही. आमच्या लेखी स्त्री व पुरुष या दोनच जाती आहेत. मात्र, भाजपने आरक्षणात आरक्षण म्हणून मातंग समाजाला बौद्ध समाजाच्या विरोधात सतत भडकविण्याचा प्रयत्न सुरु ठेवलेला आहे. मात्र, बौद्ध समाज शिक्षणाने खूपच पुढारलेला असल्याने व दुर्दैवाने मातंग समाजाने अपवाद वगळता अजूनही पुस्तकांची कास धरली नाही व त्यांच्यातील काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरां पेक्षा आणाभाऊ साठे यांना मोठे मानीत असल्याने त्यांनी बाबासाहेब स्वीकारले नाही व आज ते अधोगतीला चालले आहेत. बाबासाहेब जगविख्यात आहेत. सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत हे आम्ही कुणाला सांगण्याची अजिबात गरज नाही.. आम्हाला आण्णाभाऊ साठे यांचा नितांत आदर व अभिमान आहे. अण्णाभाऊ जरी मार्क्सवादी असले तरी सुद्धा कालांतराने त्यांनीही डॉ. बाबासाहेबांना मानलेच. आणि हेच हा समाज विसरला असल्याने भाजप यांना स्वतःच्या राजकारणासाठी बोटावर खेळवत आहे व यातूनच या बाईने संतोष पंडित यांच्यावर केस टाकली हे आता लोक उघडपणे बोलत आहेत..
शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आई बहिणी वरून शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या आणि मारण्याची धमकी दिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर मात्र काहीच कारवाई होत नाही. एक बहीण या मंत्र्यांविरोधात तक्रार करायला गेली असता पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. मग या कुणी कांबळे बाईची तक्रार पोलिसांनी एवढ्या लवकर घेतली.. पंडित रेपिस्ट, दहशतवादी किंवा खुनी नाहीत ते खरे तेच बोलत आहेत. हा सर्व भाजपचा डाव आहे व येत्या काळात भाजपने पेरलेली खोटारडी माणसे आणि स्वतः भाजपला याचे कडू फळ चाखावे लागणार आहे. एक मात्र नक्की की सुनेत्रा वहिनी सत्तेत असूनही आणि आमदार रोहित पवार यांच्या पेक्षाही ही कुणीतरी कांबळे नावाची बाई भाजपच्या जीवावर सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना वरचढ ठरली आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.