तुम्ही दिल्या की ओव्या आणि लोकांनी दिल्या की शिव्या.. पेराल तेच उगवेल..

हल्ली भाजप सारख्या काही राजकीय पक्षांची नीतिमत्ता भ्रष्ठ झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सत्तेच्या उन्मादात बरेचसे नेते, मंत्री संत्री आणि त्यांची पिलावळ तथा अंधभक्त समोरच्याला वाटेल तशा शिव्या घालतांना खूपदा दिसले आहे.

आपले कुणी वाकडे करू शकणार नाही या गुर्मीत बरेचसे नेते समोरच्याला तुच्छ लेखून शिवीगाळ करतात. विशेष म्हणजे त्यांच्या पायघड्या घालणारे अंधभक्त सुद्धा अश्लील शिव्या घालतात. यात सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना जास्त शिव्या दिल्या गेल्या आहेत. व त्या शिव्या अशा लोकांनी दिल्या आहेत की त्या लोकांची यांच्या पायाजवळ उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही. पण म्हणतात ना पेराल तेच उगवेल.. आता यांच्या मोदी आणि त्यांच्या थापाड्या आणि जातीयवादी टीमला जेव्हा प्रतिशिव्या दिल्या जात आहेत तेव्हा त्यांना नैतिकता आठवत आहे. अरे तुम्ही जेव्हा इतरांना अश्लील बोलता शिव्या देता तेव्हा तुमची नैतिकता कुठे शेण खायला जाते. जग बदलत चाललंय मित्रांनो आता कुणीच कुणाला जास्तवेळ फसवू शकत नाही.. मोदी साहेबांनी बारा वर्ष अखंड भारताला फसवले आहे. आता लोक जागे झाले आहेत. तुम्ही एक शिवी द्याल तर समोरून चार शिव्या येतील. आणि म्हणून शिव्या देण्यात आपली लायकी दाखविण्या पेक्षा लोकोपयोगी कामांना प्राधान्य द्या असे अगदी सगळ्याच पक्षांतील शिव्याबहाद्दरांना सांगावेसे वाटते.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

68

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.