सिधी बात नो बकवास..
भारतात लोकशाही आहे आणि संविधान सर्वात प्रमुख ठिकाणी आहे. मात्र सध्याच्या सरकारने लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा चंग बांधलेला आहे.. आणि याला कारणीभूत आपण आहोत. आता उठा आणि आंदोलन करायला रस्त्यावर या. आपल्या पेक्षा लहान विद्यार्थी बघा ते न डगमगता हुकूमशाही कारभार चालविणाऱ्या गुंडांच्या हातातील सरकारला नडत आहेत. मार खात आहेत पण मागे हटत नाही.. आणि आपण घरात बसून लाखाच्या बाता मारीत आहोत. हे चोरांचे सरकार आहे. अंधभक्त आणि धंदेवाली पेक्षा खालच्या पातळीवर गेलेला गोदी मीडिया यांच्यामुळे देश रसातळाला चालला आहे. EVM.. ED आणि पोलीस तथा सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून निवडून आलेले हे जातीयवादी सरकार आहे. यांना भारताचे संविधान बदलायचे आहे व मग पुन्हा जातीयवाद आणायचा आहे.
अरे बेशरमांनो चीन, जपान सारखे देश जबरदस्त प्रगती करीत असतांना तुम्ही भारताला पुन्हा पाच हजार वर्ष मागे देव-धर्म आणि अंधश्रद्धेत गुरफ़टवीत अहात. का तर अंधभक्त तयार झाले की तुमचे राज्य टिकेल आणि बहुजनांना तुमच्या पायाखाली दाबून ठेवता येईल. पण ते विसरा..आता जनता जागी झाली आहे. सर्वसामान्यांना रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, वाहतूक, वीज, पाणी इत्यादी जीवनावश्यक गोष्टी गरजेच्या आहेत. विशिष्ट वर्गाच्या पोटाची सोय करणारी तुमची मंदिरे सर्वसामान्यांना नकोत हो, त्या ऐवजी ज्ञानमंदिरे, इस्पितळे उभारा ती विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहेत.. पण, तुम्ही ते करणारच नाहीत कारण तुमचे दुकान अंधश्रद्धा पसरवूनच चालते.. म्हणूनच आता बहुजनांनी आणि लोकशाही मानणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येऊन हा संघर्ष रस्त्यावर करावा व या जातीयवादी हुकूमशाही सरकारला उखडून टाकावे आणि लोकशाही आणावी असे स्पष्टपणे सांगावेसे वाटते आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.