वीजबिलाने मारलं आणि सरकारने झोडलं तर दाद कुणाकडे मागायची ? असा काहीसा प्रश्न घरात, दुकानात इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या लोकांना पडला आहे..
एका बाजूला उन्हाने सर्वसामान्यांची जबरदस्त वाट लावलेली आहे तर दुसरीकडे वीजबिल भरमसाठ येत आहे. गरमच इतकी होत आहे तर लोक पंखे , एसी आणि कुलर लावणार नाही तर काय करणार ? नियमित वीजबिल भरले तरी लाईट मात्र अगदी कधीही मनसोक्त जात आहे. मुळात पूर्वी जे मीटर होते तेच योग्य होते. पण या बिनकामाच्या सरकारने अदानी आणि इतर भांडवलदारांच्या घशात वीज घातल्याने हे लोक सर्वसामान्यांना बिलाच्या ओझ्याखाली मारीत आहेत. भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर नालायक निघाल्याने सर्वसामान्यांचे बारा वाजले आहेत. लोक या सरकारला आई बहिणीच्या शिव्या घालीत आहेत. मात्र, हे फक्त देवेंद्र फडणवीस, गोदी मीडिया आणि अंधभक्तांनाच दिसत नाही. सरकारची चूक आणि शिव्या वीजमंडळवाल्यांना खाव्या लागत आहेत. एक दिवस बिल भरायला उशीर झाला तरी हे नवे मीटर वीज कट करते. एवढा सर्व प्रॉब्लेम असतांना भांडवदारांना नफा व्हावा म्हणून हे बिनकामाचे सरकार म्हणावा इतका सोलर पॅनेलला पाठिंबा देतांना दिसत नाही. तोडा अजून झाडे, करा अजून प्रदूषण आणि द्या पुन्हा भाजपाला निवडून. आता भोगा आपल्या कर्माची फळे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.