अभिजीत दिपकेला टायफॉइडची लागण.. 'आंदोलन थांबणार नाही' असे दिपकेने सांगितले..

CJP संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचे निदान झाले आहे. VIDEO शेअर करत त्यांनी प्रकृतीची माहिती दिली असून आंदोलन सुरूच राहणार..

शनिवारी (दि.२५) सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. प्रकृती अस्वस्थ असून उपचार सुरू असले तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'टायफॉइडचे निदान झाले, उपचार सुरू आहेत'

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिजित दिपके म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना टायफॉइडचे निदान झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

"गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नव्हती. तपासणीचे अहवाल आले असून मला टायफॉइड झाल्याचे निदान झाले आहे. माझ्यावर उपचार सुरू असून दररोज आयव्ही ड्रिपद्वारे औषधे दिली जात आहेत," असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले.

'आंदोलन सुरूच राहणार'

प्रकृतीच्या कारणामुळे आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. देशभरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

34

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.