घरगुती गॅस दोन हजार रुपयांना ब्लॅक ने.. शब्द खड्गने केली घरोघरी गॅस पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉय लोकांशी चर्चा..

गॅस आणि इतर इंधनाने भरलेली चार जहाजे इराण वरून भारतात निघाली आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे बोंबलणारी सरकारी कर्मचारी मंडळी आणि राज्यकर्ते त्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडर मागे 60 रुपये का वाढविले याचे मात्र अजिबात उत्तर देत नाही..

शब्द खड्गने घरोघरी गॅस पोहोचविणाऱ्या अनेक डिलिव्हरी बॉय लोकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. साहेब लोक आमच्या खिशात ब्लॅकने सिलिंडर घेण्यासाठी दोन दोन हजार रुपये कोंबतात. काही लोक तर अडीच तीन हजार रुपये द्यायला सुद्धा तयार असतात. आणि हॉटेलवाले चार ते पाच हजार रुपये. पण, आम्ही पैसे घेत नाही. गॅसचा खूप तुटवडा आहे आणि आमच्यावर सर्वांचीच नजर आहे. आम्ही जर ब्लॅकने सिलिंडर विकले तर आमची वाट लागेल. कामावरून तर काढतीलाच पण आमच्यावर गुन्हाही नोंदविला जाईल असे अनेक सिलिंडरवाल्यांनी शब्द खड्गला सांगितले. आता नावावरचा गॅस नोंदविला तरी ओटीपी नंबर 25 दिवसांनी येणार. म्हणजे 25 दिवसांनीच गॅस मिळणार. मोठी कुटुंबे असलेले आणि गोरगरीब या इस्त्राईल - इराण - अमेरिका युद्धाने होरपळायला सुरुवात झाली आहे. लोक इलेक्ट्रिकल शेगड्या शोधत आहेत. काही लोक कोळशाच्या शेगड्या पाहत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक शेगडीमुळे बिल जास्त येईल तर कोळसे सहजासहजी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होतील का ?? हा प्रश्न आहे. येत्या काळात इतर जीवनावश्यक वस्तू सुद्धा महाग होतील.  काही मंडळी आताच अन्नधान्याचा साठा करू लागली आहेत. कुणी कितीही नाही म्हणो पण या काळात गॅसचा ब्लॅक होणारच . पैसेवाले घेतील पण गरीब लोकांचे काय. हातगाड्या, खानावळी, पोळीभाजी सेंटर आणि हॉटेल हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काय तर घाबरू नका म्हणे.. गॅसचा, इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे हे आतातरी मान्य करा हो.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

55

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.