शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा Duet Special कार्यक्रम धडाक्यात संपन्न..

रविवार १८ जानेवारी २०२६ शब्द खड्गच्या गायकांनी गाजवला..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र, लिपिका एंटरटेनमेंट आणि मैत्रेय प्रोडक्शनचे सर्वेसर्वा प्रा. दिपक जाधव यांनी नेहमीप्रमाणे नवोदित गायक गायिकांना स्टेज उपलब्ध व्हावा म्हणून डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात आयोजित केलेला Duet Special कार्यक्रम शब्द खड्गचे गायक कलाकार आणि उपस्थितांच्या जबरदस्त सहभागाने यशस्वी झाला.

रणधीर कनौजिया अध्यक्ष असलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शब्द खड्गचे कायदेविषयक सल्लागार ॲड. प्रदिप बावस्कर, ज्येष्ठ समाजसेवक आणि गायक संजय मामा खडपे, सुनिल बनसोडे हे उपस्थित होते. 

शब्द खड्गच्या व्यवस्थापिका सौ. साईली बनसोडे यांनी हळदीकुंकू आयोजित केलं होतं त्यालाही जबरदस्त प्रतिसाद भेटला.. कार्यक्रमाचे अध्यक्ष रणधीर कनौजिया, संजय मामा खडपे, ॲड. प्रदिप बावस्कर, शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव, महेंद्र दुराल यांच्या हस्ते गायनात भाग घेतलेल्या सर्वांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

एकापेक्षा एक रंगलेल्या गाण्यांची सुरुवात पुंडलिक गोडे यांच्या गाण्याने झाली. नंतर नितीन खरात, संतोष सातघरे, स्नेहल सातघरे, अरुण दहीवलीकर, पल्लवी दहीवलीकर, भारती खरात, सत्यप्रीया जी, कल्पना बनसोडे, रमेश गभाले, महेंद्र दुराल, राजे साहेब, संजय मामा खडपे, प्रा. दिपक जाधव इत्यादी अनेकांनी एकापेक्षा एक Duet स्पेसिअल आणि सोलो गाणी गाऊन वातावरण निर्मिती केली. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शब्द खड्गचे उपसंपादक विलास चव्हाण, दिनकर सोमासे, शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी बाबू जाधव, व्यवस्थापक शिवाजी जाधव, लता जाधव, आस्तिक पाटील, मैत्रेय जाधव, ज्योती खडपे, शिंदे मावशी, चंदा कनौजिया, आदित्य कनौजिया, कृष्णा जयस्वाल, स्नेहा जंगम, मंगल पाटील, अनंत गणपत चव्हाण, अनिता अनंत चव्हाण, झरना दास, प्रिया दास, महक घोष, घोष भाभी, ऐश्वर्य बावस्कर, दीपिका माडखोलकर तथा महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राठोड मॅडम इत्यादी अनेकांनी मोलाचे सहकार्य केले. साऊंड सिस्टीम महेंद्र दुराल आणि मनीष दुबे यांची होती.. रमेश गभाले यांनी गाण्याबरोबरच साऊंड सिस्टीम अत्यंत उत्कृष्ठपणे हाताळली.. शेवटी महिला मंडळाने आणि उपस्थितांनी नितीन खरात यांच्या गाण्यावर जबरदस्त नाच करून आनंदोत्सव साजरा केलं..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

358

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.