मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालेलं आहे.. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने..

हल्लीच्या स्वार्थी आणि सबसे तेज.. सगळं इन्स्टंट हवं असं मानणाऱ्या धावत्या जगात मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालं आहे असे म्हटल्यास वावगे वाटू नये..

लाखोंमधून चार सहा लोक मनस्वी मनाने प्रेम करणारे असतील. आणि काही द्राक्ष खायला भेटत नाहीत म्हणून आंबट मानणारे आणि यालाच मानसिक प्रेम म्हणणारे आहेत. आज बहुतांश मुली मुलांच्या आणि स्त्री पुरुषांच्या म्हणजे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांच्या बाबतीत शरीरधर्म अजिबात उरलेला नाही. आज लोक एकमेकांत भावनिकदृष्ट्या गुंतण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. फक्त सेक्स याच गोष्टीला महत्व दिले जाते आहे. ऐकायला कदाचित हे वाईट वाटते पण हेच सत्य आहे. तू नही तो और सही.. हे जीवनाचे तत्व झाल्याने कुणाला कुणासाठी वेळ नाही. आणि यातूनच लिव्ह इन सारख्या संकल्पना उदयास आलेल्या आहेत. मुळात प्रेम देश, आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र मैत्रिणी, पत्नी, मुले आणि जगातील सर्व चांगल्या आणि विधायक गोष्टींवर तथा माणसातील माणुसकीवर आणि एकोप्यावर करायला हवे. पण, आपल्याला जाती पातीत विभागून राजकारण खेळले गेल्याने हे शक्य होत नाही.. आणि मुळात पाश्चात्य सांगतात म्हणून आपण १४ फेब्रुवारीलाच म्हणजे फक्त एकाच दिवशी प्रेम करायचे का. तर अजिबात नाही. आपण प्रेमाने जग जिकायला हवे आणि तेही अगदी कायम बारा महिने निरंतर..

का साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे :

व्हॅलेंटाईन डे हा सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या ख्रिश्चन धर्मगुरुंच्या बलिदानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. रोमचा सम्राट क्लॉडियस याने १४ फेब्रुवारी, इ.स. २७० रोजी व्हॅलेंटाईनला फाशी दिली, कारण त्यांनी राजाच्या आदेशाविरुद्ध जाऊन सैनिकांची लग्नं लावली होती आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला होता. त्यांना प्रेमाचा संदेशवाहक मानले जाते..

राजा क्लॉडियसला वाटत होते की, लग्न केल्यामुळे सैनिक कमकुवत होतात, म्हणून त्याने लग्न करण्यावर बंदी घातली. मात्र, संत व्हॅलेंटाईनने या आदेशाचे उल्लंघन करत प्रेम करणाऱ्या जोडप्यांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. मात्र,  काही समजुतींनुसार, व्हॅलेंटाईनने ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला आणि जेलरच्या आंधळ्या मुलीला दृष्टी दिली, यामुळे राजा संतप्त झाला होता..

ऐतिहासिक महत्त्व: पोप गेलेसियस I यांनी इ.स. ४९६ मध्ये या दिवसाला मान्यता दिली आणि सेंट व्हॅलेंटाईनच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जाऊ लागला.. फाशीच्या आधी, जेलमध्ये असताना त्यांनी जेलरच्या मुलीला 'युअर व्हॅलेंटाईन' (Your Valentine) असे सही करून एक निरोप पाठवला होता, ज्यावरून 'व्हॅलेंटाईन डे' ची प्रथा पडली, अशी आख्यायिका आहे..

- प्रा. दिपक जाधव. शब्दखड्ग डिजिटल वृत्तपत्र..

100

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.