शब्द साधे, पण अर्थ मोठा..

शब्द साधे, पण अर्थ मोठा,

सत्य सांगण्याचं धाडस,

दररोजच्या बातम्यांतून,

तुमचं दिसतं प्रामाणिक कर्तव्य..

समाजातल्या छोट्या–मोठ्या प्रश्नांना,

तुम्ही दिली योग्य दिशा,

सामान्य माणसाच्या अडचणी,

तुमच्या लेखणीने मिळाली भाषा..

कोणाच्या बाजूने नाही उभे,

तर सत्याच्या बाजूने ठाम,

भीती न बाळगता लिहिलंत नेहमी,

म्हणूनच वाढला तुमचा सन्मान.

नावासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही,

तुमचं काम समाजासाठी,

चुकीचं चुकीचं सांगण्याचं धैर्य,

हेच तुमचं मोठं यश खरे..

आज या सत्काराच्या क्षणी,

मनापासून म्हणतो आम्ही सारे,

आदरणीय दीपक सर,

तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे.

तुमची लेखणी अशीच चालू राहो,

सत्याची वाट दाखवत,

नव्या पिढीला शिकवत राहो,

योग्य काय, अयोग्य काय ओळखत..

लोकशाहीचा चौथा स्तंभ

तुम्ही शब्दांतून सावरला,

प्रश्न विचारायची जिद्द देऊन

अनेक मनांना तुम्ही जागं केलं.

याच सदिच्छांसह,

आपला सन्मान स्वीकारावा…

 - सौ. उज्वला पानमंद. विशेष प्रतीनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

( रविवार १४ डिसेंबर २०२५ रोजी शब्द खड्ग चा मनातली गाणी हा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी शब्द खड्ग चे संस्थापक- संपादक प्रा. दिपक जाधव यांच्यावर सौ. उज्वला यांनी ही वरील कविता केली..)

188

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.