प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला चहा महत्वाची भूमिका निभावतो..

एरव्ही चहाला आपण एक साधारण पेय समजतो. पण, हा चहाच प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला महत्वाची भूमिका निभावतो.. रुसलेल्याला हसवतो, सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी अथवा मुद्दाम चहाचे निमित्त काढून भेटीगाठी घडवायला हा चहा खूपदा कारणीभूत ठरतो. खरंतर चहाचा उगम प्राचीन चीनमध्ये झाला. एका दंतकथेनुसार, २७३७ ईसवी सन पूर्व मध्ये चिनी सम्राट शेंग नुंग (Shen Nong) यांनी चुकून चहाचा शोध लावला.. सुरुवातीला चहाचा वापर औषधी पेय म्हणून आणि धार्मिक समारंभांमध्ये केला जात असे नंतर चीनमधून तो जपान आणि इतर आशियाई देशांत, आणि पुढे ब्रिटीशांमार्फत भारतात लोकप्रिय झाला. भेटीगाठीसाठी अथवा काहीतरी मनातले बोलायचे आहे. मात्र, ते कसे बोलावे हे कळत नसेल तर हमखास आपण एकमेकांना चहासाठी बोलवतो व हळूच आपल्या मनातलं बोलून जातो.

थोडक्यात काय तर कुठलाही विषय काढण्यासाठी चहा मध्यस्थी करतो. आपल्या स्वभावाचे जेवढे रंग असतात तेवढेच चहाचे सुद्धा प्रकार असतात. पण प्रेमाचा आणि कौटुंबिक चहा, मित्र - मैत्रिणींसोबत निवांत बसून घेतलेला चहा सर्वात उत्तम असतो. प्रेमाचा चहा प्रियकर प्रियसीला आयुष्यभराची सोबत करायला भाग पाडतो.. आपल्याकडे प्रसंग सुखाचा असो अथवा दुःखाचा असो मात्र चहाला बोलाविण्याची पद्धत आहे.. असा हा चहा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा कुठल्याही ऋतूंत आपली सोबत करतो.. भिजलेल्या आणि कुडकुडणाऱ्या अंगाने पिलेला चहा म्हणजे स्वर्ग सुख. त्यात त्या चहा सोबत ऐकायला चांगलं गाणं असेल तर मग क्या बात है.. फक्त वाचत आणि ऐकतच बसू नका तर कधीतरी आम्हाला चहाला सुद्धा बोलवा.. कळलं का..??

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

149

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.