रंग प्रेमाचे..

होळी सण म्हणजे आनंदाची पर्वणी.. रंगांची उधळण.. दुःखाचा होळीत अंत.. परस्पर प्रेमाचा विश्वासाचा आनंद सोहळा.. गालाला लागलेले होळीचे विविध रंग आयुष्य रंगीत करतात..मात्र, हे रंग सरडा रंग बदलतो तसे रंग बदलणारे नसावेत..

मानवी जन्म एकदाच मिळतो आणि म्हणून एकमेकांसोबत आनंदाने समजुतीने रहावे.. तुम्ही कितीही पैसे आणि इस्टेट कमवा. मात्र, या पैकी काहीच आपल्याला सोबत घेऊन जाता येत नाही. आपल्या मागे आपले नाव रहावे असे वाटत असल्यास चांगुलपणा जोपासायला शिकावा. आपले सण हीच एकोप्याची शिकवण देतात. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, मातीतून येऊन मातीतच जायचे असते. आपल्याला एका जन्मात अनेक भूमिका वठवून जायचे आहे. रक्ताची, मैत्रीची आणि प्रेमाची नाती आपण फुलवायला हवीत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सणासुदीला आपल्या जीवाला थोडासा आनंद मिळतो. बहुतांश लोकांचे रोजचे जगणे खूप कष्टप्रद आहे. म्हणून आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपून ठेवा. शब्द खड्ग परिवारा तर्फे आपण सर्वांना आनंदी होळीच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेछया..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

61

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.