MSEB ची दादागिरी फक्त सर्वसामान्यांवर..डोंबिवलीकर नागरिकांची उद्विग्नता..

शब्द खड्ग रोज संध्याकाळी एखाद्या चहाच्या टपरीवर अथवा हॉटेलात बसलेल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्यां बद्दल बोलतं करतो. हे लोक अगदी सर्वसामान्य आणि पापभिरू असतात. बिनधास्त मते मांडतात आणि ती मते खूप मनस्वी असतात. या मतांची दखल संबंधित घेतील न घेतील याची तमा ना बाळगता ही मंडळी त्यांच्या मनातील उद्विग्नता मांडीत असते..

हा डोंबिवलीतील मुद्दा असल्याने आपण डोंबिवलीकरांची मते इथे विचारात घेत आहोत हे लक्षात घ्या.. सर्वसामान्यांच्या मते जे पैसेवाले आणि गुंड प्रवृत्तीचे लोक वीज बिल भरीत नाहीत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची धमक MSEB मध्ये नाही. किंवा मग हे लोक चिरीमिरी देऊन कर्मचाऱ्यांना गार करतात. पैसे भरू पळून जातोय का किंवा कधीकधी तर कर्मचाऱ्यांना दम देतात आणि धक्काबुक्की सुद्धा करतात. मात्र, हेच पैसेवाल्यांचा, गाववाल्यांचा मार  खाल्लेले, शिव्या खाल्लेले कर्मचारी गरिबांचे बिल एक दिवस जरी थकले तरी त्यांना फोन करून त्रास देतात. वीज कापण्याच्या  धमक्या देतात.. म्हणजे जे नियमित वीजबिल भारतात ते एक दिवस जरी लेट झाले तरी तुम्ही त्यांच्या जीवावर उठता आणि जे तुम्हाला फाट्यावर मारून वीजबील थकवितात त्यांचं तुम्ही काय करता..?? हा सवाल नियमित वीजबील भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

86

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.