शब्द खड्गचा मनातली गाणी कार्यक्रम दणक्यात संपन्न..

नेहमी प्रमाणे जुन्या जाणत्या आणि नवख्या कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याचा शिरस्ता शब्द खड्गने यावेळीही पाळला.. रविवार २५ /०५/२०२५ महात्मा गांधी विद्यालय डोंबिवली पश्चिम येथे रंगला सोहळा..

व्याख्यान असो, काव्योत्सव असो, एकपात्री अभिनय असो अथवा लेखन - दिग्दर्शन - अभिनयाची कार्यशाळा असो, वैद्यकीय शिबीर असो, अथवा पोलीस महिलांचा सत्कार आणि समाजात विविध गोष्टींत सक्रिय सहभाग नोंदविलेल्या सर्वसामान्य आणि मान्यवरांचा सत्कार,  पोलीस तथा तृतीयपंथीय लोकांसाठी कार्यक्रम आणि महिलांसाठी अगदी हळदीकुंकू ते थेट फॅशन शो असे विविध कार्यक्रम राबविणाऱ्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने आपल्या शिरस्त्याला जागत रविवारी मनातली गाणी हा कार्यक्रम दणक्यात संपन्न करून उपस्थित रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.

या कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नव्याने डोंबिवली उपशहर प्रमुख म्हणून नियुक्त झालेले तथा शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी असलेल्या  श्री. शाम चौगले यांचा शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी सत्कार केला. यावेळी दहावी मध्ये उत्कृष्ठरित्या उत्तीर्ण झालेल्या दीक्षांत जाधव याचा शब्द खड्ग तर्फे सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रविकांत जाधव तर स्वागताध्यक्षा सौ. उज्वला पानमंद आणि कार्याध्यक्ष श्री. रमेश गभाले हे होते. या प्रसंगी श्री. संजय मामा खडपे आणि श्री. रमाकांत पालवे यांची महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर श्री. पुंडलिक गोडे यांना विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले.

मनातली गाणी कार्यक्रमात शब्द खड्गचे एव्हरग्रीन सिंगर नितिन खरात, पुंडलिक गोडे, संजय मामा खडपे, रविकांत जाधव, कल्पना बनसोडे, शैलजा पाटील, दीक्षांत जाधव, श्रीपाद बावडेकर काका, गेली चाळीस वर्ष डोंबिवली मध्ये संगीताचे क्लास चालविणारे बासू शिरंगी आणि प्रा. दिपक जाधव यांनी एका पेक्षा एक सरस गाणी गाऊन वातावरण निर्मिती केली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. साईली बनसोडे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेश बोरसे सर, बाबू जाधव, शिवाजी जाधव, लता जाधव, मैत्रेय जाधव, सुनिल बनसोडे, उदय बनसोडे, ढवळे साहेब, तृप्ती जाधव, अवंतिका जाधव, मिक्सरवले मनीष दुबे, महेंद्र दुरल, महात्मा गांधींच्या शिंदे मावशी, सिद्धार्थ खरात आणि शब्द खड्गची संपूर्ण टीम तथा मित्रपरिवाराचे विशेष सहकार्य लाभले..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

81

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.