रविवार २३ फेब्रुवारी २०२५ चा दिवस शब्द खड्गने गाजवला..
आमच्या मावशी कै.सुमन एकनाथ बावस्कर यांच्या स्मरणार्थ कराओके गायन स्पर्धा संपन्न..
शब्द खड्गच्या शिरस्त्या नुसार डोंबिवली येथे शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांच्या आयोजनाखाली महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली पश्चिम येथे आमच्या मावशी कै. सुमन एकनाथ बावस्कर यांच्या स्मरणार्थ नवोदित गायकांसाठी गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन खरात. कार्याध्यक्ष पुंडलिक गोडे, व्यवस्थापक उज्वला पानमंद, रविकांत जाधव हे होते. तर, एड. प्रदीप बावस्कर, संजय मामा खडपे, सुनील बनसोडे, साईली बनसोडे, शिवाजी जाधव, लता जाधव, बाबू जाधव, अशोक म्हस्के, रमेश गभाले, विलास चव्हाण, मनीष दुबे, धूरल साहेब, सुरेश बोरसे सर, संतोष सर्वदे, शिल्पा साळवी, ज्योती खडपे, अलका बिर्जे, मंगल पाटील, मैत्रेय जाधव आणि शब्द खड्गच्या सम्पूर्ण टीम ने सहकार्य केले.
विशेष उपस्थितीत- समाजसेवक प्रल्हाद म्हात्रे दादा, रमेश काठे, हिम्मत म्हात्रे, गणेश पाटील, माया गायकवाड, सुभाष बावस्कर, उत्तम पाटेकर, मंगल पाटेकर, अनमोल म्हात्रे, निखिल पाटेकर, देवकी पवार आणि शब्द खड्गच्या संपूर्ण टीमचा शाल आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला..
गायन स्पर्धेत शैलजा भालचंद्र पाटील, पंकज तुरडे, अनिलराज सोनार (PSI ), विजय तायडे (PSI ), कमालुद्दीन साहेब (PSI ), रमेश राघवन, श्रीपाद बावडेकर काका, नीलिमा शेट्ये , नेहा बिर्जे, सुरभी शिंदे, रुपेश जाधव, किंजल जाधव, क्रिशा जाधव, बावस्कर वाहिनी यांनी गाणी गायली.
शब्द खड्ग तर्फे पुंडलिक गोडे, नितीन खरात, संजय मामा खडपे, रविकांत जाधव, रमेश गभाले आणि प्रा. दिपक जाधव यांनी जबरदस्त गाणी गायली. मात्र, शब्द खड्ग टीम आयोजक असल्याने नंबरात नव्हते.
सुरुवातीला कै. सुमन मावशी बावस्कर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या स्पर्धेत रमेश राघवन यांना प्रथम क्रमांक मिळाला, नंदेश पांचाळ यांना द्वितीय क्रमांक तर शैलजा पाटील यांना तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचे परीक्षक संजय मामा खडपे आणि नितीन खरात होते.
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.