शब्द खड्गच्या विशेष प्रतिनिधी सौ. उज्वला योगेश पानमंद यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आदर्श शिक्षिका तथा सावित्रीबाई फुले आणि इतर बरेचसे पुरस्कार भेटलेल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या सन्माननीय सदस्या तथा विशेष प्रतिनिधी सौ. उज्वला पानमंद यांना संपूर्ण शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र परिवारा तर्फे त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया..

आजवर मी अनेक पुरुष आणि महिलां बद्दल लिहिले आहे, उज्वला यांचा स्वभाव हा या इतर सर्व लिहिलेल्यां पेक्षा खूपच वेगळा आणि रुजू आहे. त्यांना गाजण्याचा मुळीच सोस नाही आणि त्या कुणाशी स्वतःची तुलना, सुद्धा करीत नाहीत. त्यांना दिलेलं काम त्या अगदी एकशेदहा टक्के  पूर्ण करतातच. उज्वला यांच्या बद्दल मी प्रथमच लिहीत आहे. अगदी चिमुटभर काम केलं तरी ढीगभर प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्यांच्या यादीत उज्वला बसतच नाहीत कारण त्या प्रसिद्धीसाठी काहीच करीत नाहीत. आणि म्हणून मला त्या वेगळ्या वाटतात.  उज्वला अत्यंत मनमिळावू आणि कामात तत्पर आहेत. कुणाच्याही मदतीला त्या सदैव तत्पर असतात. शब्द खड्ग घेत असलेल्या विविध कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती असते.. त्यांचे मिस्टर योगेश पानमंद हे तर अत्यंत दिलदार आणि समजूतदार प्रवृत्तीचे सद्गृहस्थ आहेत. नील नावाचा त्यांना एक मुलगा आहे. तो ही आई वडिलांसारखाच शांत आणि नम्र आहे. आणि म्हणूनच सतत प्रसिद्धी पासून दूर राहू पाहणाऱ्या आमच्या शब्द खड्गच्या उज्वला सारख्या आधारस्तंभाला आमच्यावतीने प्रकाशात आणणे खूप गरजेचे वाटले म्हणून हा शब्द प्रपंच. पुन्हा एकदा उज्वला आणि योगेश जी या उभयतांना शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र परिवारा तर्फे त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

62

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.