पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आर . पी . आय . शाखा कसारा यांनी केला निषेध..

या हल्ल्याच्या निषेधार्थ आर.पी.आय ने कसारा पोलीस स्टेशनला दिले निवेदन..

सविस्तर वृत्त - जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे विविध भागातून पर्यटक फिरण्यास येत असतात. आपल्या मित्रपरिवार तथा कुटुंबियांसोबत आनंद घेत असतांनाच पाकधार्जिण्या आतिरीक्ऱ्यानी अंधाधुंद गोळीबार बार करून निष्पाप  26 लोकांचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिडियाच्या माध्यमातून कळताच  भारतीय नागरिकांनी पाकिस्तान विषय संताप व्यक्त केली आहे . नागरिकाचे मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने ठोस कारवाई  ‌होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा कसाऱ्याच्या वतीने कसारा पोलिस स्टेशन चे पी .आय . गावित यांना निवेदन देऊन अतिरिकी हल्लाचा निषेध केला आहे . जनतेच्या भावना सरकारला कळविण्यास निवेदनात म्हटले आहे . निवेदन . सुहास जगताप , उपाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश आर . पी . आय  , राजेंद्र उबाळे - अध्यक्ष - आर .  पी . आय . शाखा कसारा , संतोष कर्डक - सरचिटणीस आर . पी . आय शाखा कसारा यांनी दिले आहे.

- रमाकांत पालवे. ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

10

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.