हल्ली सगळ्यांनाच सगळं फुकटात हवं आहे..

माझ्याकडे रोज पंधरावीस प्रसिद्धीच्या बातम्या आणि कविता छापण्यासाठी येतात. यापूर्वी अनेकांना मी फुकटात प्रसिद्धी दिली आहे. त्यात समाजोपयोगी आणि गोर गरिबांच्या, अन्यायग्रस्तांच्या बातम्या आपण नेहमीच फुकटात लावतो व कायम लावूच. पण, काही राजकारणी तथा स्वतःचा उदोउदो व्हावा म्हणून वृत्तपत्र अथवा चॅनेलला बातमी लागावी अशी अपेक्षा करणारी मंडळी काही अगदी अगदी मोजका अपवाद वगळता यांच्या प्रसिद्धीच्या बातम्या आपण फुकटात लावाव्यात अशी अपेक्षा करतात. हे किराणा घ्यायला दुकानात गेले अथवा मोठ्या वृत्तपत्रांकडे गेले तर यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीच्या बातम्या कुणी फुकटात लावील का हो. जरा विचारून पहा. मी स्वतः अनेक मोठ्या दैनिकांत काम केलेले असल्याने अगदी कुणीही असो त्याची प्रसिद्धीची बातमी फुकटात लावायची नाही. त्या बातमीच्या बदल्यात पेपरला जाहिरात घ्यायची असा अलिखित नियम आहे. लोकांना हे कळूनही वळतच नाही हो. आपलं शब्द खड्ग वृत्तपत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजीत चालतं. आपण कॅमेरा अथवा मोबाइलने शूटिंग केलेल्या बातम्या सुद्धा आपल्या वृत्तपत्रात पोस्ट करतो आणि डिजिटल पेपर असल्याने आपल्याला दरवर्षी गुगलला यासाठी मोठी रक्कम भरावी लागते. पण, हे कानी कपाळी ओरडून सुद्धा काही फुकट्यांना कळतच नाही..

वृत्तपत्र व्यवसाय माझी रोजी रोटी आहे. तुम्ही सगळ्याच गोष्टी माझ्याकडून फुकटात घेऊ पाहणार असाल तर ते शक्य नाही. कुणालाही आता फुकटात गाजवणार नाही मग माझ्याशी तुम्ही बोलला नाहीत तरी चालेल. काय गंमत आहे ना.. गाजायचंय तुम्हाला आणि तुम्ही माझ्या खांद्यावरून आणि तेही फुकटात गाजू पाहणार.. ज्यांना कुठेच संधी नाही अशा लोकांसाठी आम्ही गाण्याचे, काव्योत्सवाचे आणि इतर समाजोपयोगी कार्यक्रम सतत करतो. पण, त्यातही जर कुणी तुमच्या जवळचं असेल तर या कार्यक्रमासाठी लागणारा मोठा आर्थिक हातभार तुम्ही उचलायला हवा. पण, असं फार कमी वेळा होतं. शब्द खड्ग करतंय ना मग करुदेत आपण गंमत बघू.. जेवढं फुकटात भेटतंय तेवढं पदरात पाडून घेऊ असंच सध्या चाललंय.  आणि म्हणूनच म्हणतोय की, ही विचारसरणी सोडा आता.. मी माझ्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं आहे प्रसिद्धीच्या बातम्या विनामूल्य लावायच्याच नाहीत. कुणाला वाईट वाटलं असेल तर खुशाल वाटुदे.. आमचाही नाईलाज आहे.. तुम्ही तुमचे पैसे वाचवायच्या नादात आम्हाला खड्ड्यात घालू लागले अहात म्हणून हा शब्द प्रपंच केला आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

31

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.