आज सोशल मीडियाचा विचार करता प्रबोधनाची गरज अपवाद वगळता तरुणींना नहीं तर काही फोर्टी- फिफ्टी प्लस बायांना असल्याचे माझे स्पष्ट मत आहे..
काही सन्माननीय अपवाद असलेल्या माता - भगिनी आणि बंधू भावांना दिलगिरी व्यक्त करून आज पुन्हा एकदा स्पष्ट बोलतोय. खरं तर माझ्या पोटतिडकीने बोलण्याचा प्रत्येक लेखागणिक माझ्या पाच - सात माता भगिनी बोध घेतात आणि सावध होतात. खरे तर हे माझ्या लेखनाचे यश आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आणि ज्यांना गावाने ओवाळून टाकलंय अशा चावट प्रवृत्तीच्या व्यक्ती आणखी चेकाळतात हेही सत्य आहे. खरे तर गाढव आणि गाढवी पुढे गीता वाचण्यात काहीच अर्थ नाही हे मला ठाऊक असूनही दिल है के मानता नहीं अशी माझी सवय झाली आहे. पत्रकार आणि समाजकारणी म्हणून अभ्यास करतांना आज सोशल मीडियाचा विचार करता प्रबोधनाची गरज काही सन्माननीय अपवाद वगळता तरुणींना नाही तर काही मोजक्या चेकाळलेल्या फोर्टी- फिफ्टी प्लस बायांना असल्याचे माझे स्पष्ट मत आहे.. तरुणींपेक्षा काही अपवाद वगळता चाळीशी पन्नाशी पार केलेल्या काही बाया रिल्स आणि सोशल मीडियावर तत्सम गोष्टी करतांना इतक्या चेकाळतात की यांच्या पेक्षा मजबूर आणि परिस्थितीने धंदा करण्यासाठी देहाच्या दलदलीत लोटल्या गेलेल्या महिला सभ्य असाव्यात असे वाटते. पैसे मिळतात म्हणून यांचे भाडखाऊ नवरे, मुले, आई - वडील, भाऊ, बहीण यांना काहीच बोलत नाहीत.
खरंतर पूर्वी म्हटलं जायचं की कीर्तनाने कुणी सुधरत नहीं आणि तमाशाने कुणी बिघडत नहीं.. मी लहान असतांना जेव्हा हे वाक्य एखाद्या वयस्क माणसाच्या तोंडून ऐकायचो तेव्हा ही व्यक्ती खोटं बोलतेय असं मला वाटायचं. पण, मोठा होऊन जसा सामाजिक कार्य आणि पत्रकारितेत सक्रिय झालो तसं मला त्या वयस्क माणसांचं बोलणं पटू लागलं. छछोरपणा आणि चावटपणा हा काही लोकांच्या रक्तात आणि स्वभावातच असतो याची मला पदोपदी साक्ष पटत आहे. सोशल मीडिया खूप चांगला आहे. माझ्या काही माता भगिनी आणि भाऊ त्याचा खूप चांगला उपयोग करून इतरांना ज्ञान देतात. सात्विक मनोरंजन सुद्धा करतात. मला अशा लोकांचा खूप अभिमान वाटतो. कुणी काय करावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य जरी असलं तरी काही चावट म्हाताऱ्यां मुळे तरुण पिढी बिघडल्यास मला तरी नवल वाटणार नाही. काय जमाना आलाय गंगा उलटी वाहू लागली आहे. म्हाताऱ्यांनी तरुणांना आदर्श घालून द्यायचा तर काही म्हाताऱ्याच आज इतक्या चेकाळलेल्या आहेत की त्यांना कायद्याने आवर घालावा असं मला संबंधितांना आणि पोलीस तथा सरकारला सांगावसं वाटतंय..
मी वेळोवेळी प्रबोधन करीत असतो त्याचा फायदा काही माता भगिनी घेतात. मात्र, फेसबुकवर बरेचसे स्त्री आणि पुरुष समोरच्याला अगदी सर्व प्रकारचं फसवायला त्यात शारीरिक आणि आर्थिक शोषण करायला गळ टाकून बसलेले आहेत हे वारंवार सांगून सुद्धा काही जवळच्या महिला आपलं बोलणं ऐकत नाहीत. अख्ख्या गावाने ओवाळून टाकलेले चावट लोक यांना आवडतात. मला अनेक लोक फॉलो करतात, मी किती फेमस आहे असं या महामूर्ख बाया समजतात. या बेअक्कल बायांना इतकं सुद्धा समजत नाही की हे लिंगपिसाट फक्त तुलाच नाही तर इतरही अनेक बायांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. या विषयावर मी अनेक तज्ज्ञ आणि पोलीस अधिकाऱ्यांशी अनौपचारिक बोलतो तेव्हा ते मला म्हणतात की, सर तुमच्या साधी गोष्ट लक्षात येत नाही काय. अहो, या बायांना तुमचं चांगलं बोलणं कधीच पटणार नाही कारण या बायांना सुद्धा चावट पुरुषच आवडतात. तुम्ही वेडे अहात सर या अशा लो क्वालिटीच्या बायांना समजवायला जाता. खरंय माझी चूक मला कळली आहे. ज्या असंतुष्ट आहेत स्वतःहून समोरच्याला आमंत्रण देतात त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही हे मला आता पुरेपूर पटलंय.. पुन्हा एकदा सांगतो माझ्या काही माता-भगिनी आणि भाऊ खूप सभ्य आहेत. सर्वच वाईट नसतात हो... पण दुःख याचं वाटतं की या अशा चवचाल लोकांमुळे सोशल मीडिया नाहक बदनाम होत आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.