माझी फोटोग्राफी.. जगणे म्हणजे काटेरी तारेवरचा खडतर प्रवास आहे..

आपल्या आजूबाजूला किड्या मुंग्यांसारखी माणसे वावरतांना दिसतात. रोजच्या धावपळीत कोण काय करतंय आणि कसं जगतंय याचा आपल्या पैकी अनेकांच्या मनात कधी विचार सुद्धा येत नाही. आपल्यासाठी शंभर रुपये अगदी साधी गोष्ट असू शकतात. पण, तेच शंभर रुपये एखाद्या गरीबाच्या घरातील एका दिवसा पूर्ती का होईना पण किमान चौघांची वडापाव खाऊन भूक भागवू शकतात. जगणं सोपं त्यांच्यासाठी आहे ज्यांचं पोट भरलेलं आहे. पण, ज्यांची जगण्याची लढाई रोज सुरु आहे त्यांना हे जगणं काटेरी तारेवरचा खडतर प्रवास वाटतो. माझी फोटोग्राफी साठी असाच एक फोटो घरातल्या खिडक्यांना काटेरी जाळ्या बसविणाऱ्या व प्रामाणिक मेहनत करणाऱ्या शिवाजीराव पाताडे आणि फिरोज हिवाली यांचा टिपला आहे. मला विशेष याचे वाटले की, अंगमेहनतीची कामे मराठी माणूस जास्त प्रमाणात करतांना दिसत नाही. ही कामे उत्तरप्रदेश, बिहार आणि बंगाली लोक करतात असा समज आहे. पण पाताडे मराठी आहेत आणि सतत हाताला जखम होणारं तारेचं जड काम करतात. आनंद वाटला आणि वाईट सुद्धा वाटलं. तर त्यांचा सहकारी फिरोज उत्तरप्रदेश कडचा आहे. बोलणं कमी मात्र काम जास्त असा फिरोज बघायला मिळाला. जगायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही हे ही लोकं माझ्याशी बोलतांना सहजपणे बोलून गेली..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

31

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.