अत्यंत पुढारलेला सोशल मीडिया.. त्यातून येणारी काही इन्व्हिटेशन आणि धोक्याची घंटी..

सोशल मीडिया दुधारी तलवार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं..

अत्यंत पुढारलेला सोशल मीडिया जसा आपल्याला खूप फायद्याचा आहे तसाच जर आपण त्याचा चुकीचा वापर केला व आपल्याला कोण काय करेल ते बघू नंतरचे नंतर असा विचार केला तर निश्चितच आपले बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. सोशल मीडिया म्हणजे मिठा जहर असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. खूप विचाराअंती मी आज काही साईट वरील बरीचशी इन्व्हिटेशन स्वीकारली आहेत. मी ती स्वीकारलीत कारण मी पत्रकार आहे आणि मला खोलात जाऊन त्याची माहिती घ्यायची आहे. मध्यप्रदेशातील अत्यंत डेंजर डॉन जो   बाविसाव्या वर्षी प्रतिस्पर्धि टोळीकडून मारला गेला तो दुर्लभ कश्यप. हा दुर्लभ महाकाल म्हणजे शंकराचा भक्त होता आणि तो सोशल मीडियावरून खंडणी, खुनाच्या सुपाऱ्या घ्यायचा द्यायचा.. कुख्यात लॉरेन्स बिष्णोई सुद्धा असंच करतो असं ऐकून आहे. इथे सगळेच ग्रुप वाईट आहेत असं आम्ही मुळीच म्हणत नाही. पण, काही ग्रुप गुन्हे करण्यासाठीच वापरले जातात असा अनेकांचा संशय आहे. आणि पोलिसांच्या सायबर सेलची सुद्धा यावर सतत नजर आहे.

फिफ्टी, सिक्स्टी प्लस रिअल फ्रेंडशिप ग्रुप, मुली आणि विधवा, परित्यक्ता महिला व्हिडिओ चॅटिंग अशा अनेक साईटने इथे धुमाकूळ घातलेला आहे. या साऱ्याच साईट वाईट नाही. पण काही साईटवरून अश्लीलतेला आणि वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जाते असा संशय आहे. मला आज सहज चेक करतांना फारच नवल वाटले. कदाचित गंमत म्हणून असतील पण या साईटवर माझे काही सो कॉल्ड मित्र मैत्रिणी मला दिसले. आणि या अश्लील साईट आहेत बरे.... पत्रकार म्हणून मला स्ट्रिंग करायचे आहे म्हणा अथवा जनजागृती करायची आहे असे समजा हवेतर. पण, चांगल्या घरातील महिला मुलींनी आणि पुरुषांनी सुद्धा मजा म्हणून सुद्धा ही नाही तर मुळीच या साईटच्या मोहात पडू नये. आणि पैसे मिळतात म्हणून youTube ने सुद्धा अशा साईटचे उदात्तीकरण करू नये. त्याचबरोबर अश्लील रिल्स करणाऱ्यांना थांबवावे. मला महिला, मुलींना इथे प्रामाणिकपणे सांगावयाचे आहे की, गुन्हा झाल्यानंतर अथवा तुम्ही फसविल्या गेल्या नंतर किंवा तुमचं लैंगिक शोषण झाल्या नंतर जागं होण्या पेक्षा गुन्हा होणारच नाही व आपण फसल्या, फसविल्या जाणारच नाही याची तुमची तुम्हीच काळजी घ्यायला नको का.. काही वेळा पैसा आणि प्रसिद्धीसाठी स्वतःच नंगा नाच करायचा आणि मग अश्लील कमेंट्स यायला लागल्या की लोकांच्या नावाने बोटं मोडायची. माफ करा पण काही अपवाद वगळता यात पन्नाशी पुढच्या बायाच कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळताना दिसत आहेत. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, तुम्ही तुमच्याही नकळत सोशल मीडियाला तुमच्यावर स्वार करून तुमचं अंधानुकरण करणारी तरुणांची एक पिढीच्या पिढी बरबाद करायला निघालेले अहात याची जाणीव ठेवा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

26

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.