'पोलिटिकल महाराष्ट्रच्या' पेजवर अभिजीत दीपके यांच्या बद्दल सुजात यांनी जे मत नोंदविले आहे त्या मताला शंभर मधल्या नव्यान्नव लोकांनी अक्षरश: नाकारले आहे व सुजात यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. जर आपल्याला हे वाचायचे असेल तर आपण पोलिटिकल महाराष्ट्र पेज सर्च करा तिथे हे सारे दिसेल आणि सुजात यांचा व्हिडिओ सुद्धा दिसेल..
अभिजीत बद्दल काय म्हटले सुजात हे जाणून घेऊया :
अभिजित दीपके आरएसएसचं काम करीत असल्याची सुजात आंबेडकरांना शंका. दिपके वाचत असलेले आंबेडकरांचं छायाचित्र असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशकाचा आरएसएसशी संबंध असल्याचा दावा..
सुजात आंबेडकरांच्या वक्तव्याचा वाचकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुळात आंबेडकर आडनाव असलं म्हणजे कुणी बाबासाहेब होत नाही. अभिजित विद्यार्थ्यांसाठी लढतो आहे. नीट परीक्षा आणि तत्सम परीक्षांत झालेले घोटाळे आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नसतील तर आम्ही आता पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा मागू अशी मागणी कॉकरोच चे अभिजित दीपके जोरदारपणे करीत आहेत. अवघ्या काही दिवसांत त्यांचे लाखोंनी फॉलोअर्स झाले आहेत. दिपकेना भारतभरातून आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक तथा विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कलाकार इत्यादी इत्यादींचा पाठिंबा मिळत आहे..
आता आम्ही केलेल्या सर्वेक्षणात सर्वसामान्य लोकांनी सुजात यांना काही प्रश्न विचारले आहेत :
दीपके हातात कुठलं पुस्तक घेत आहेत या पेक्षा त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत व ते जातीपाती विरहित विद्यार्थ्यांच्या हितासाठी, लोकशाही आणि घटनेसाठी लढत आहेत. सुजात आपण दीपके यांच्यासारखं कुठलं भव्य दिव्य काम केलं आहे का ? किमान दीपके यांना केवळ भारतातूनच नाहीतर भारताबाहेरील लोकांकडूनही कौतुकाचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे. असे प्रोत्साहन आपल्याला एक टक्का तरी आहे काय ? आणि स्पष्टच बोलायचं झालं तर लोक फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतात आणि कायम मानतील. आपण का उगीचच बाबासाहेब बनायला जाता ? आणि देशभरात पंधरा एक विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटी मुळे आत्महत्या केल्यात. त्यात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आहेत. मुळात दीपके यांच्यासोबत सुद्धा सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते तथा पाठीराखे आहेत.
दिपके फक्त जातीचं कार्ड खेळत नाहीत ते विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे लढत आहेत. त्यांची लोकांना दखल घेणं ते भाग पाडीत आहेत. सुजात आपली दखल अशा प्रकारे कुणी घेतं का ? हा प्रश्न एकदा स्वतःच स्वतःला विचारा हो. आपण कधी आदित्य ठाकरेंची टीका करता तर कधी अमित ठाकरेंची.. हे लोक स्वतःचं आंदोलन करतात तसं तुम्हीही तुमचं आंदोलन करा ना. कशाला काहीही विषय उकरून काढून स्वतःचं हसं करून घेता आणि समाजाला वेठीस धरता ? दीपके आपलेच आहेत आणि तुमच्यापेक्षा करोडोपटीने ते हुशार सुद्धा आहेत. आणि तुमच्या पेक्षा प्रसिद्धीत ते करोडोपटीने पुढे सुद्धा गेले आहेत याचा अभिमान बाळगा व त्यांना प्रोत्साहन देता येत नसेल तर किमान त्यांचे पाय तरी मागे खेचू नका..
हजारो वर्षांत फक्त एकदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे क्रांतिसूर्य जन्माला येतात हेही लक्षात राहुदेत. सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी जयपूरच्या कॉकरोच च्या सभेत अभिजीत दीपके त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मात्र दीपके डगमगले नाहीत आम्ही अजूनही खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या बाजूने लढत राहू असा त्यांनी निर्धार व्यक्त केला. समोरच्याचे मोठेपण मान्य करण्या इतके आपण मोठे व्हा सुजात.. बाकी तुम्ही, बहुजन समाज आणि भारतातील तमाम जनता सुज्ञ आहे ..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.