मुंबई महापालिकेतही ‘ऑपरेशन टायगर’?
ठाकरे सेनेचे खासदार फुटल्याचे पडसाद आता मुंबई महापालिकेतही उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
खासदार आणि आमदारांनंतर आता ठाकरे गटातील नगरसेवकांमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, आगामी काळात पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा युवासेना नेते अमेय घोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे २० ते २५ नगरसेवक सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, असे सांगत घोले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याने नाराजी
ठाकरे गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच मुख्य कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे, असे घोले यांनी स्पष्ट केले.
पैसा आणि प्रतिष्ठेची लढाई त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा भाजपा आणि शिंदे सेनेने उचललेला विडा आणि अजूनही उद्धव ठाकरे मैदानात उतरत नसल्याने कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने असलेली नाराजी. या सर्व गोष्टी या प्रकरणाला प्रथमदर्शनी कारणीभूत ठरत आहेत..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.