पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा..पावसाने ओढ दिल्याने धरणांत पाणीसाठा कमी..

१६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणीसाठा केवळ १०.३५ टक्के इतकाच शिल्लक असल्याचे BMC ने स्पष्ट केले आहे..

१५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, धरणांतील पाणीसाठा घटत असल्याने १७ जूनपासून नवीन बांधकामांना जलजोडणी देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आल्या असून औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

धरणांतील पाणीसाठा घटल्याने BMC सतर्क

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांना दररोज सुमारे ४,६४६ दशलक्ष लिटर (MLD) पाण्याची आवश्यकता असते. उपलब्ध साठ्यातून सध्या सरासरी ४,२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पावसाच्या विलंबामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. 

उद्योग, व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लबसाठी फटका

पिण्याच्या पाण्याऐवजी पर्यायी स्रोत वापरण्याचे स्पोर्ट्स क्लब आणि इतर उद्योग व्यवसायांना, कंपन्यांना आवाहन..

सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहे चालवणाऱ्या संस्थांना टँकर, बोअरवेल किंवा इतर पर्यायी स्रोतांतील पाण्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहन धुणे, उद्यानांतील झाडांना पाणी घालणे तसेच रस्ते आणि परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी विहीर, कूपनलिका किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

रेल्वे, MIDC आणि मोठ्या संस्थांनाही सूचना

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, RCF, HPCL, BPCL, नेव्ही, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि BPT यांसारख्या संस्थांना दुय्यम वापरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) मधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवीन बांधकामांना जलजोडणी बंद

पाणी बचतीसाठी सर्व नवीन बांधकामांना दिल्या जाणाऱ्या जलजोडण्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व जलतरण तलावांच्या (Swimming Pool) जलजोडण्याही तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाण्याचा अपव्यय आढळल्यास कारवाईचा इशारा..

पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन BMC ने केले आहे. तसेच महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा गैरवापर किंवा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

69

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.