सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवलेले शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( अजित दादा पवार ) उद्योग विभागाच्या मुंबई विभाग सचिव पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजया भोसले मॅडम, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत कदम साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब यांनी निवड केली आहे. राष्ट्रवादीचे मुंबई विभाग उद्योग अध्यक्ष अश्विन केळकर यांनी प्रा. दिपक जाधव यांच्या नावाची शिफारस केली..
आज मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिम येथे शाम चौगले ( ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ), अश्विन केळकर ( मुंबई विभाग उद्योग अध्यक्ष ), व्यंकटेश नायडू ( कल्याण / डोंबिवली शहर अध्यक्ष ), रवी गोवर्धन ( ठाणे संघटक ), रवींद्र शिंदे ( कार्यालय प्रमुख ), शब्द खड्गचे उपसंपादक विलास चव्हाण, शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी बाबू जाधव, भूमिका शिरोडकर, होसणारा खातून, वैद्य राखाडे यांच्या उपस्थितीत प्रा. दिपक जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रा. दिपक जाधव यांच्या निवडीने वृत्तपत्र क्षेत्र, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि परिसर, शब्द खड्ग परिवार तथा मित्रमंडळींकडून जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
- विलास चव्हाण. उपसंपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.