या प्रकरणा बाबत शब्द खड्गने साधला सर्वसामान्यांशी संवाद..
प्रणित ने अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. प्रणित मोरेच्या शोमधील '३७० रुपयांची बिर्याणी' आणि डॉक्टर सेजल पवार या तरुणीचे मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचे अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.त्यामुळे देशभरात मोठा गदारोळ झाला असून संतापाची लाट उसळली आहे. अशातच डॉ. सेजल पवारने केईएम रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचे संपूर्ण रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे प्रणित मोरेने देखील सोशल मीडियातून माफी मागितली आहे. माझी ती सर्वात मोठी चूक होती, मला माफ करा आणि पुन्हा एक संधी द्या, मी नक्कीच चांगला व्यक्ती बनून दाखवेन, असे तो म्हणाला. असे असताना आता कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी वाढणार असून गृहविभागाकडून त्याच्या यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार आहे.
. 'विनोद न करता विकृती करत असाल, तर थेट कारवाई होईल', असा सज्जड दम गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला. ३७० च्या बिर्याणीचे वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि डॉ. सेजल पवारवर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर सेजल पवारने आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असली, तरी हे प्रकरण त्यांना भोवणार असेच दिसते आहे.
डॉ. सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल..
केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडून दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित व्हिडीओ तसेच त्यातील कथित वक्तव्यांची या समितीकडून पडताळणी केली जाते आहे. शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना चौकशी समितीला देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणा बाबत शब्द खड्गने साधला सर्वसामान्यांशी संवाद..
सर्वसामान्यांच्या मते भावनांशी खेळणाऱ्या आणि अश्लील गोष्टी सादर करून विकृत आनंद घेणाऱ्या कंटेंटर लोकांना कायद्याचा चाप लावावा. डॉ. सेजल ही रिसर्वेशन कोट्यातून मुंबईच्या केईएम हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे. तिला सध्या पंधरा दिवसांसाठी हॉस्पिटल प्रशासनाने सस्पेंड केले असले तरी. लोकांच्या मते फक्त सेजल आणि प्रणीतच नाही तर अशा प्रकारचे अश्लील रील्स बनविणाऱ्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी व यांच्यावर बहिष्कार टाकावा असे मत मांडले गेले. यात प्रामुख्याने पैशांसाठी खूपशा थोराड स्त्रिया आणि मुली शरीराचे उत्तान प्रदर्शन करीत रील्स बनवितात त्यावर त्यांना कायद्याने दणका द्यावा असेही खूपसे लोक म्हटले. डॉ. सेजल मुळे रिझर्वेशनवर जळणाऱ्या मंडळींच्या हातात आयतेच कोलीत भेटले आहे. विनोद हा विनोदासारखाच असावा असे जवळपास सर्वच लोक बोलले..
प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.