निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पुरेसे संरक्षण देण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश..

दाऊदी बोहरा समाजाच्या आध्यात्मिक प्रमुखांसंदर्भात २०२४ मध्ये दिलेल्या निकालावरून धमक्यांना सामोरे जात असलेले उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांना संरक्षण द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले..

मुंबई : दाऊदी बोहरा समाजाच्या आध्यात्मिक प्रमुखांसंदर्भात २०२४ मध्ये दिलेल्या निकालावरून धमक्यांना सामोरे जात असलेले उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांना संरक्षण द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.

या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी व्यक्तिशः लक्ष घालावे आणि सद्यस्थिती अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने नमूद केले. एप्रिल २०२४ मध्ये न्यायमूर्ती पटेल यांनी सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या बाजुने निकाल दिला. हा निकाल मागे घेण्यासाठी व युट्युबवर माफीनामा जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून दबाव टाकला जात आहे. हे धमक्यांचे सत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या न्यायमूर्ती पटेल यांच्या मुलीवर रस्त्यावर हल्ला करण्यात आला. त्यात तिचे नाक फ्रॅक्चर झाले. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पुरेसे संरक्षण देण्याचे निर्देश दिले.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

52

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.