सेवाधारित कंत्राट पद्धतीविरोधात मोटर लोडरांचे कामबंद आंदोलन.. भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवईत कचऱ्याचे ढीग..या पद्धतीविरोधात कर्मचारी आक्रमक..

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा संकलनासाठी सेवाआधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती लागू करण्यास सुरुवात करताच त्याला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर एस वॉर्डमध्ये (भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई) सुरू होताच २५० हून अधिक मोटर लोडर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे..

मुंबईत दररोज सुमारे ७,२०० मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. हा कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दररोज सुमारे १,३३४ वाहने कार्यरत असतात. यामध्ये महापालिकेची तसेच कंत्राटदारांची वाहने वापरली जातात. या वाहनांवर कार्यरत असलेले मोटर लोडर कर्मचारी रस्त्यावरील कचरा उचलून वाहनांमध्ये भरण्याचे महत्त्वाचे काम करतात.

हे आंदोलन खासगीकरणाच्या विरोधात आहे.. 

मनुष्यबळ कंत्राटदार पुरवणार

महापालिकेने आता २६ पैकी २२ वॉर्डमध्ये सेवाआधारित कंत्राट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवस्थेनुसार कचरा वाहतूक, वाहने आणि संबंधित मनुष्यबळ कंत्राटदारांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे, तर महापालिकेच्या विद्यमान मोटर लोडर कर्मचाऱ्यांना समकक्ष कामांवर पुनर्नियुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, मात्र यालाच कर्मचाऱ्यांचा जोरदार विरोध आहे. 

आंदोलन आणि इतर कर्मचाऱ्यांची मनस्थिती पाहता इतर वार्ड मध्ये सुद्धा हे आंदोलन सुरु होईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी संबंधितांना दिला आहे..

41

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.