जुहू येथे नाल्यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

अंधेरी पश्चिम येथील जुहू परिसरातील नाल्यात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निहाल नाझिम मिर्झा (२४) हा तरुण पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढत कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले..

मुंबई : जेव्हीपीडी स्कीम परिसरातील उघड्या नाल्यात दुपारी एक व्यक्ती पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती दुपारी १२.०९ वाजता बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेत नाल्यात पडलेल्या तरुणाला बाहेर काढले. त्याला तत्काळ खासगी रुग्णवाहिकेद्वारे कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कूपर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

63

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.