जून महिना पावसाशिवाय.. १४६ वर्षांतील सर्वात कोरडा महिना..

मुंबई: जून महिन्याअखेरीस भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर द्वीपकल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस मोसमी वारे संपूर्ण देशभर पोहचायला हवे होते. पण अजूनही देशातील अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण आणि निरभ्र आकाश दिसून येत आहे. मध्य भारतात पावसाची ५९ टक्के तूट आहे तर गुजरातमध्ये तब्बल ८४ टक्के कामी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातही सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. जून २०२६ गेल्या १ ४६ वर्षांमधील सर्वात कोरडा जून होता.

केरळ किनारपट्टीवर पोहोचलेला मान्सून १५ जूनपर्यंत दक्षिण, पूर्व, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये व्यापला होता. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल अचानक थांबली. त्यानंतर काही भागांमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. मुंबईमध्ये २३ ते २४ जूनदरम्यान २४ तास मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरडं वातावरण निर्माण झालं. तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यातही गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला असला तरी शहरात फक्त हलक्या सरींची नोंद झाली आहे. घाट परिसरात तर तुरळक पाऊसचं नोंदला गेला. 

अगोदरच गर्मी आणि महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना पाऊस पडला नाही तर पिण्याचे पाणी आणि अन्न धान्य महागाईला तोंड द्यावे लागेल. निसर्गाचा समतोल बिघडविण्यास माणूसच जबाबदार असल्यानी चिंता सर्वसामान्यवर्गातून व्यक्त होत आहे..

43

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.