रेसिपी.. साधीसोपी मुगभजी..

सकाळचा नाश्ता  असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे.. 

साहित्य : एकवटी मुगडाळ, कार पाच हिरव्या मिरच्या, सात आठ लसणाच्या पाकळ्या, छोटा आले तुकडा, चवी पुरते मीठ, जिरं , कोथिंबीर, तेल, खायचा सोडा इत्यादी..

कृती : अर्धा तास मुगडाळ भिजवत ठेवायची त्यानंतर वरील सर्व पदार्थ मिक्सर मध्ये जाडसर वाटायचे आणि हे मिश्रण एकत्र करून आपल्याला जी साईज हवी त्यानुसार गोळे करून तापलेल्या तेलात ते सोडायचे. हे भजी खरपूस तळल्यावर प्लेट मध्ये काढून घेऊन टोमॅटो सॉस अथवा नारळाच्या चटणीबरोबर गरमागरम खायचे.. अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात हा पदार्थ तयार होतो.. 

- लता जाधव. ( डोंबिवली )

98
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.