रेसिपी.. भाताचे कटलेट..

बाहेर धो धो कोसळणारा पाऊस.. थंडीने अंग चोरून बसलेले मुंबईकर चाकरमानी आणि सोबत आज वेगळ्या प्रकारे बनविलेली भाताच्या कटलेटची  रेसिपी. खवैयांना ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण रोजच्या कटलेट पेक्षा ही थोडी वेगळी आहे.. 

साहित्य : आपण रोज खातो तो शिजविलेले भात, बेसन, तेल, जिरं, हळद,  कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता, लसूण, आलं, मसाला, चवीपुरतं मीठ इत्यादी.. 

कृती : वरील सर्व साहित्य बेसनात मिक्स करून बॅटरला थोडं पाणी सुटल्यावर मग आपल्याला हवेतसे गोळे करून कढईत कडकडीत तापविलेल्या तेलात हे गोळे सोडून गुलाबी रंग येईस्तोवर कुरकुरीत तळून घ्यावेत आणि नंतर सॉस किंवा चटणी, कांदा - मिरची अथवा गरमागरम चहा कॉफि सोबत याचा आस्वाद घ्यावा. बनवायला हे कटलेट खूप सोपे असल्याने आणि पावसात हे खाण्याची लज्जत काही औरच असल्याने आपण हे नक्की करून पहावेत.. 

- लता जाधव. ( डोंबिवली )

238
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.