साहित्य : गव्हाचे पीठ, मैदा, मक्याचे पीठ, तेल, तूप, साखरेचा पाक, वेलची, केसर, चवी पुरते मीठ इत्यादी..
कृती : गहू आणि मैदा हे तुपात मिक्स करायचे आणि मग याच्या पोळ्या लाटून एक एक पोळीवर तूप लावून थोडे मक्याचे पीठ लावून चार पाच पोळ्या एकावर एक ठेवून लाटायचा आणि मग साच्या मध्ये हवा तो आकार देऊन हे चिरोटे तेलात खरपूस तळायचे आणि नंतर साखरेच्या पाकात मस्त घोळवून घ्यायचे.. खूप खरपूस आणि गोड लागतात..हे चिरोटे.. नक्की एकदा तरी करून पहा. मी हे खास गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून बनविले आहेत..
- लता जाधव. ( डोंबिवली )..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.