जिकडे तिकडे विठ्ठल नामाचा गजर सुरु असताना उपवासासाठी काही करणे गरजेचे वाटले. नेहमी तेच तेच करण्या पेक्षा आज थोडसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला नक्कीच आवडेल..
साहित्य : साबुदाणा, तीन चार बटाटे, शेंगदाणा कूट, तीन चार हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, तेल, चवीनुसार मीठ.. इत्यादी..
कृती : अगोदर साबुदाणे भाजून घ्यायचे आणि मग साबुदाणे व शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे, हिरवी मिरची, अद्रक हेही वाटून या मिश्रणात उकडलेले बटाटे कुस्करून एकजीव करायचे. या सर्व सर्व मिश्रणाला तेलाच्या हलक्या हाताने ट्रँगल आकार द्यायचा आणि कढईत तेल घालून त्याला उकळी आल्यावर हे साबुदाणा ट्रँगल्स.. कुरकुरीत तळून घ्यायचे. दह्या सोबत हे ट्रँगल्स खूप छान लागतात. एकदा नक्की करून पहा..
- लता जाधव. ( डोंबिवली )
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.