साहित्य : मैद्याचं पीठ, रवा, दही, तेल, मीठ, छोले, आलं लसूण पेस्ट, खोबरे, जिरं, कडीपत्ता, कांदा टोमॅटो पेस्ट इत्यादी..
कृती : पीठ थोडं तेल घालून मळून घ्यावं.. साधारणतः अर्धा तास बाजूला स्वच्छ पांढऱ्या कापडात ठेवावं. नंतर त्याचे आपल्याला हव्या त्या साईजचे व्यवथित भटुरे ( पुऱ्या ) लाटून घ्यावात आणि गरम तेलात छानपैकी तळाव्यात.. तासभर स्वच्छ पाण्यात भिजवून घेतलेले छोले सुद्धा कांदा आला लसूण पेस्ट, तेल, खवलेलं खोबरं आणि कढई मध्ये पाणी घालून एकजीव करून उकळी येऊ द्यावी.. छोले घट्ट करायचे की पातळ हे ज्याने त्याने आपापल्या आवडी नुसार ठरवायचे. या डिश बरोबर आम्ही गोडाचा शिरा सुद्धा ठेवलेला आहे. अर्थात ज्याची त्याची आवड.. गरम गरम छोले भटुरे खायला खूप छान लागतात..
- लता जाधव. ( डोंबिवली )
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.