आता रेल्वे स्टेशन मास्तरांना भटक्या कुत्र्यांवर सुद्धा नजर ठेवावी लागणार.. आणखी एक जबाबदारी!..

मुंबई विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्टेशन मास्तरांवर कोणत्या नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत..

स्टेशन मास्तरांची जबाबदारी आता केवळ गाड्यांची वेळ, प्रवाशांची व्यवस्था किंवा स्थानकाचे नियोजन यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता त्यांना स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांवरही नजर ठेवावी लागणार आहे. मुंबई लोकल स्थानकांवर वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर (प्रभारी) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

प्रत्येक स्थानकासाठी नोडल अधिकारी

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित स्थानकाचे स्टेशन सुपरिटेंडंट किंवा स्टेशन मास्टर (प्रभारी) हेच नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

नियमित पाहणी आणि तातडीची कारवाई

नोडल अधिकाऱ्यांना स्थानक परिसराची नियमित पाहणी करावी लागणार आहे. भटके कुत्रे प्लॅटफॉर्म किंवा स्थानकात येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

तक्रार करण्याची सुविधा

प्रवाशांना कोणतीही अडचण आल्यास त्वरित तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक स्थानकावर संबंधित नोडल अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबतची माहिती किंवा तक्रार थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. 

सुरक्षेला प्राधान्य

गेल्या काही वर्षांत रेल्वे स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय ठरला होता. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर किंवा प्रवेशद्वाराजवळ कुत्रे बसलेले असल्याने प्रवाशांना अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय, रेल्वे बोर्ड आणि पश्चिम रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 

मात्र या बद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये मतभिन्नता असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही..

46

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.