मेटा आणि गुगलविरुद्ध गडकरींचा ११ कोटींचा दावा..

इथेनॉल मिश्रित ई-२० इंधन धोरणाची संबंधित कथित बदनामीकारक व डीपफेक मजकुरामुळे देशात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटा व गुगलविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ११ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे..

मुंबई : इथेनॉल मिश्रित ई-२० इंधन धोरणाची संबंधित कथित बदनामीकारक व डीपफेक मजकुरामुळे देशात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटा व गुगलविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ११ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे. हा बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश देण्याची मागणी या याचिकेत केली आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी या याचिकेची दखल घेत सुनावणी ५ ऑगस्टला निश्चित केली आहे. कालच सोमवारी 27 जुलै रोजी उच्च न्यायालयाने गडकरी यांना हा दावा दाखल करण्यास परवानगी दिली होती.

अज्ञान व्यक्तींनी पसरवलेल्या या बदनामीकारक मजकुरात ई २० इंधन या संदर्भात गडकरी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचे चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आले होते.

34

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.